धारधार तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:06 AM2021-05-05T04:06:16+5:302021-05-05T04:06:16+5:30

खुलताबाद : टाकळी राजेराय गावात क्षुल्लक कारणावरून झालेल्या बाचाबाचीत एकाने धारधार तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यात एक जण ...

Attempt to attack with a sharp sword | धारधार तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न

धारधार तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न

googlenewsNext

खुलताबाद : टाकळी राजेराय गावात क्षुल्लक कारणावरून झालेल्या बाचाबाचीत एकाने धारधार तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यात एक जण किरकोळ जखमी झाला आहे. याप्रकरणी आरेफ जब्बार पठाण (रा. टा. राजेराय) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अमोल राजू ठाकूर (रा. टा. राजेराय) याच्याविरोधात धारधार शस्त्र बाळगून जखमी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आरेफ जब्बार पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, टाकळी राजेराय येथील बसस्थानकावर सोमवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास एका दुकानासमोर बसलेलो होतो. त्या ठिकाणी गावातील अमोल राजू ठाकूर हा देखील बसस्थानकासमोर उभा होता. तो आरेफ याच्याकडे एकसारखा रागाने बघत थुंकत होता. विनाकारण शिवीगाळ करीत होता. तेव्हा आरेफने अमोलकडे जाऊन, ‘तू माझ्याकडे एकटक बघून का शिवीगाळ का करीत आहेस’, असे विचारले. त्यावर दोघांत भांडण सुरू झाले. त्यावर अमोल याने आरेफला,‘तू येथेच थांब तुला दाखवितो’, असे म्हणत तो घरी निघून गेला. थोड्या वेळानंतर तो पुन्हा आला. येताना धारदार तलवार हातात घेत आरेफवर हल्ला करणार होता. मात्र, यावेळ‌ी बसस्थानक परिसरात उपस्थित असलेल्या नासेर पटेल, सादीक पठाण, शाकीर पटेल, अजिज शेख, मनोज औटे व काही लोकांनी त्यास पकडले. झालेल्या झटापटीत आरेफ यांच्या हाताला किरकोळ मार लागला. याप्रकरणी अमोल ठाकूर याच्याविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार वाघ करीत आहेत.

फोटो : टाकळी राजेराय येथे तलवारीने हल्ला करण्याच्या तयारीत असताना एकाच्या हातातून तलवार ताब्यात घेताना काही नागरिक.

Web Title: Attempt to attack with a sharp sword

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.