औरंगाबादेत एटीएमवर गोळ्या झाडून रोकड लुटण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 12:16 AM2018-04-06T00:16:49+5:302018-04-06T11:17:43+5:30

एटीएम मशीन फोडून त्यातील रोकड लुटण्यासाठी आतापर्यंत अनेक प्रकारच्या युक्त्या-क्लृप्त्या चोरट्यांनी केल्याचे ऐकिवात आहे; पण बुधवारी रात्री शहरातील सेव्हन हिल ते गजानन महाराज मंदिर रोडवरील एटीएम मशीन फोडण्यासाठी चोरट्यांनी चक्क पिस्टलातून फायरिंग केल्याचे समोर आले.

An attempt was made to ransack the ATM in Aurangabad | औरंगाबादेत एटीएमवर गोळ्या झाडून रोकड लुटण्याचा प्रयत्न

औरंगाबादेत एटीएमवर गोळ्या झाडून रोकड लुटण्याचा प्रयत्न

googlenewsNext
ठळक मुद्देखळबळ : चोरी झालेले पिस्टल वापरल्याचा संशय

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : एटीएम मशीन फोडून त्यातील रोकड लुटण्यासाठी आतापर्यंत अनेक प्रकारच्या युक्त्या-क्लृप्त्या चोरट्यांनी केल्याचे ऐकिवात आहे; पण बुधवारी रात्री शहरातील सेव्हन हिल ते गजानन महाराज मंदिर रोडवरील एटीएम मशीन फोडण्यासाठी चोरट्यांनी चक्क पिस्टलातून फायरिंग केल्याचे समोर आले. एवढे करूनही एटीएम मशीन फोडण्यात त्यांना यश न आल्याने ३ लाख २० हजारांची रोकड सुरक्षित राहिली.

पोलिसांनी सांगितले की, सेवन हिल ते गजानन महाराज मंदिर रोडवरील नीलेश आॅटोमोबॉईल या दुकानाशेजारी एस.बी.आय.चे एटीएम सेंटर आहे. या एटीएम सेंटरवर सुरक्षारक्षक नसतो, ही बाब हेरून गुरुवारी पहाटे ३.१५ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी हे एटीएम लुटण्याचा प्रयत्न केला. एटीएम मशीनचा पत्रा उचकटल्यानंतरही रोकड निघत नसल्याने आरोपींनी मशीनवर पिस्टलमधून दोन गोळ्या फायर केल्या. या फायरिंगनंतरही मशीनमधील पैशांचा ट्रे त्यांच्या हाती लागला नाही. यामुळे रिकाम्या हाताने चोरटे तेथून पसार झाले. गुरुवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास बँकेचे अधिकारी कर्मचारी एटीएम मशीनमध्ये नोटा जमा करण्यासाठी गेले असता त्यांना एटीएमचा पत्रा उचकटलेला दिसल्याने त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पुंडलिकनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक एल.ए. सिनगारे, गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी कांबळे, सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

ते पिस्टल चोरीचे?
आरोपींनी एटीएम मशीन फोडण्यासाठी फायरिंग केल्याने मशीनला दोन भोके पडली. शिवाय गोळ्यांच्या दोन रिकाम्या पुंगळ्याही (केस) घटनास्थळी एटीएम सेंटरवर पोलिसांना मिळाल्या. या पुंगळ्या सरकारी गोळ्यासारख्याच आहेत. तीन महिन्यांपूर्वी पोलीस कॉन्स्टेबल अमित स्वामी याचे सर्व्हिस पिस्टल आणि दहा राऊंड आकाशवाणी चौकात झालेल्या अपघातानंतर चोरीला गेले होते. तेच पिस्टल आणि गोळ्या एटीएम फोडण्यासाठी आरोपींनी वापरले आहे का, यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक कांबळे यांनी दिली.

एक सीसीटीव्ही केला बंद
आरोपींनी रात्री साडेबारा ते तीन वाजेदरम्यान एटीएम लुटीचा प्रयत्न केला. त्याकरिता आरोपींनी प्रथम एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही कॅमेरा रात्री पाऊण वाजता बंद केला. मात्र, मशीनमध्येही कॅमेरा असतो, त्यामुळे आपण पकडले जाऊ ही बाब लक्षात घेऊन आरोपींनी एटीएम सेंटरमधील सर्व लाईट बंद करून अंधार केला. या मशीनमधील सीसीटीव्ही कॅ मेºयाचे चित्रण शुक्रवारी पोलिसांना मिळणार आहे. हे चित्रण मिळाल्यानंतर चोरट्यांना शोधणे पोलिसांना सोपे होणार आहे.

३ लाख ३८ हजार वाचले
आरोपींनी एटीएम सेंटरमध्ये प्रवेश केल्यानंतर मशीनच्या बाहेरच्या लॉकवर गोळी झाडली. त्यानंतर ते उघडले. मात्र, रोख रक्कम असलेल्या तिजोरीचे लॉक उघडण्यासाठी त्यांनी पुन्हा दुसरी गोळी झाडली. ही गोळी आतमध्येच अडकून राहिल्याने आरोपीच्या प्रयत्नांवर पाणी फेरले. तिजोरी उघडली नसल्याने मशीनमधील रोख ३ लाख ३८ हजार रुपये चोरी होण्यापासून वाचल्याचे पोलिसांनी
सांगितले.

Web Title: An attempt was made to ransack the ATM in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.