बोगस डाॅक्टरवर कारवाईसाठी गेलेल्या पथकावर हल्ल्याचा प्रयत्न,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:04 AM2021-05-20T04:04:16+5:302021-05-20T04:04:16+5:30

पैठण तालुक्यातील बालानगर येथील घटना जायकवाडी : बालानगर (ता. पैठण) येथे बोगस डाॅक्टरवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकावर जमावाने हल्ला ...

Attempted attack on bogus doctor | बोगस डाॅक्टरवर कारवाईसाठी गेलेल्या पथकावर हल्ल्याचा प्रयत्न,

बोगस डाॅक्टरवर कारवाईसाठी गेलेल्या पथकावर हल्ल्याचा प्रयत्न,

googlenewsNext

पैठण तालुक्यातील बालानगर येथील घटना

जायकवाडी : बालानगर (ता. पैठण) येथे बोगस डाॅक्टरवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकावर जमावाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी दुपारी १२ वाजेदरम्यान घडली. याप्रकरणी ५ आरोपींविरुद्ध एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बालानगर येथे बोगस डॉक्टर अरबिंदो बिस्वास हा दवाखाना चालवत असल्याची माहिती आरोग्य पथकाला मिळाली. बुधवारी दुपारी ११: ५३ वाजेच्या सुमारास पैठण तालुका आरोग्य अधिकारी भूषण आगाज, मोसीन शेख, वैद्यकीय अधिकारी युसुफ मनियार, वैद्यकीय अधिकारी सुभाष थोरात यांच्या पथकाने तेथे डॉक्टर बिस्वास यांच्या दवाखान्यावर छापा टाकला. सदर डॉक्टरकडे कोणत्याही प्रकारची वैद्यकीय शैक्षणिक पात्रता आढळली नाही. तेथे ॲलोपॅथिक औषधी व इंजेक्शनचा साठा तसेच शस्त्रक्रिया करण्याची उपकरणे आढळली. याबाबत चौकशी सुरू असताना बोगस डॉ. बिस्वास याने आरडाओरड केल्याने गावातील लोक जमा केले. यावेळी आरोपी भगवान गोर्डे, शिवाजी गोर्डे यांनी डॉक्टरवर कारवाई करू नका, असे पथकाला बजावले. तसेच शिवीगाळ,धक्काबुक्की करीत तेथील इंजेक्शनचा साठा व शस्त्रक्रियेची उपकरणे घेऊन पसार झाले. गावातील रवी भुजबळ, आशिफ शेख या दोघांनी विनाकारण तेथे गर्दी केली होती. याबाबत माहिती मिळताच सपोनि. अर्चना पाटील यांनी घटनास्थळी पाेहोचून गर्दी पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी युसुफ मनियार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डॉक्टर असल्याचे भासवून ग्रामस्थांची फसवणूक केल्याप्रकरणी डॉ. अरविंदो बिस्वास याच्याविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. तसेच धक्काबुकी, शिवीगाळ, हल्ल्याचा प्रयत्न करणे तसेच गर्दी जमविणे आदी प्रकरणी वरील चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनि. अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार राजू जावळे, तुकाराम मारकळ, राजेंद्र जिवढे, शरद पवार हे करीत आहेत.

कोट

आम्ही आरोग्य पथकासह बालानगर येथे बोगस डॉक्टर बिस्वास याच्यावर कारवाई करण्यासाठी गेलो होतो. तपासणीत तो १५ वर्षांपासून तेथे बोगस दवाखाना चालवित असल्याच दिसून आले. डिग्री नसतानाही रुग्णांवर सर्रास ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करताना आढळून आला.

-डाॅ. भूषण आगाज, तालुका आरोग्य अधिकारी, पैठण

फोटो कॕॅप्शन : १)बालानगर येथील बोगस डाॅ. अरविंद बिस्वास यांच्या दवाखान्याची झाडाझडती घेऊन चौकशी करताना आरोग्य पथक.

२)अवैधरीत्या साठवण्यात आलेला औषधाचा साठा.

Web Title: Attempted attack on bogus doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.