नागरिकांनो लक्ष द्या, गुंठेवारी योजनेला ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
By मुजीब देवणीकर | Updated: June 27, 2024 19:38 IST2024-06-27T19:38:20+5:302024-06-27T19:38:31+5:30
महापालिकेने ६ ऑगस्ट २०२१ ला ठराव घेऊन गुंठेवारीच्या अंमलबजावणीस सुरुवात केली.

नागरिकांनो लक्ष द्या, गुंठेवारी योजनेला ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
छत्रपती संभाजीनगर : गुंठेवारी भागातील अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. विशेष बाब म्हणजे, गुंठेवारी दरात ५० टक्के सूटही राहणार आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही मनपातर्फे करण्यात आले आहे.
महापालिकेने ६ ऑगस्ट २०२१ ला ठराव घेऊन गुंठेवारीच्या अंमलबजावणीस सुरुवात केली. अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठीचे १ मे २०२३ पर्यंत मुदत होती. त्याला वेळोवेळी मुदतवाढ देऊन ३१ एप्रिल २०२४ पर्यंत वाढ देण्यात आली. मागील काही दिवसांत ७०० पेक्षा अधिक फायली दाखल झाल्या. प्रशासनाने ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यानंतर प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत, असे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांनी सांगितले. गुंठेवारी नियमितीकरणास सुरुवात झाल्यानंतर महापालिकेने रेडीरेकनर दरात ५० टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ही सूट हळूहळू बंद करण्यात आली. त्यामुळे फायलींचा ओघ बंद झाला होता. पण शहरातील लोकप्रतिनिधी, महापालिकेच्या माजी पदाधिकाऱ्यांनी पुन्हा सूट सुरू करण्याची मागणी प्रशासकाकडे केली. प्रशासकांनी पुन्हा एकदा सूट जाहीर केल्यानंतर नागरिक मोठ्या संख्येने फायली दाखल करीत आहेत. त्यामुळे ही सूट कायम राहणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
--------