जप्तीची वाहने परस्पर नेणाऱ्या चालकांवर लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:33 AM2020-12-17T04:33:00+5:302020-12-17T04:33:00+5:30
रस्त्यावरील नाल्यामध्ये कचरा फेकण्याचा प्रकार औरंगाबाद : रेल्वे स्टेशन ते मध्यवर्ती बसस्थानक रस्त्यावरील नाल्यात गेल्या काही दिवसांपासून कचरा फेकण्याचा ...
रस्त्यावरील नाल्यामध्ये
कचरा फेकण्याचा प्रकार
औरंगाबाद : रेल्वे स्टेशन ते मध्यवर्ती बसस्थानक रस्त्यावरील नाल्यात गेल्या काही दिवसांपासून कचरा फेकण्याचा प्रकार होत आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. याकडे महापालिकेने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
दुभाजकातील झाडे
पाण्याअभावी सुकली
औरंगाबाद : औरंगपुरा चौकातील दुभाजकातील अर्धी झाडे सुकून गेली आहेत. झाडांना पाणी देण्याकडे दुर्लक्ष होत असल्याची ओरड नागरिकांतून होत आहे. अर्धी झाडे वाढलेली आणि अर्धी झाडे सुकलेली, अशी अवस्था झाली आहे.
उभ्या शहर बसमध्ये
ताटकळतात प्रवासी
औरंगाबाद : औरंगपुऱ्यात उभ्या शहर बसमध्ये प्रवासी बसून असतात; परंतु बस रवाना होत नसल्याची स्थिती पाहायला मिळत आहे. याविषयी प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे. आसन क्षमता पूर्ण होताच नियोजित वेळेपूर्वीही बस रवाना केली पाहिजे, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
निराला बाजार परिसरात
रस्त्यावर पाण्याची डबकी
औरंगाबाद : निराला बाजार, औरंगपुरा परिसरात रस्त्याच्या कडेला जागोजागी सांडपाण्याची डबकी साचली आहेत. पाण्यामुळे रस्ताही चिखलमय झाला आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना ये-जा करताना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.