प्रवाशांनो लक्ष द्या! आजपासून बिडकीन, पैठण, सोलापूर-धुळे महामार्गावरील वाहतुकीत बदल
By सुमित डोळे | Published: May 10, 2024 01:53 PM2024-05-10T13:53:47+5:302024-05-10T13:54:26+5:30
नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामानिमित्त आजपासून बिडकीन शहरातून जड वाहतुकीस बंदी
छत्रपती संभाजीनगर : नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामानिमित्त महाराष्ट्र जीवन प्राधिकरणतर्फे सध्या जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पैठण बिडकीन या मुख्य मार्गावर या जलवाहिनीसह रस्त्याचेही काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा होत आहे. ही बाब लक्षात घेत पोलिस अधीक्षक मनीष कलवानीया यांनी १० मेपासून पुढील आदेश येईपर्यंत बिडकीन शहरातून जाणारी सर्व जड वाहतूक बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत.
असा असेल बदल
-छत्रपती संभाजीनगरकडून पैठणकडे जाणारी जड वाहने छत्रपती संभाजीनगर, निलजगाव फाटा, एल.अँड टी मार्गे डीएमआयसी रोड मार्गे पैठणकडे जातील व येतील.
-जालना रोडवरील करमाड मार्गे कचनेर कमान, कचनेर गाव पोरगाव फाटा, बिडकीन, निलजगाव फाटा, बिडकीन, शेकटा फाटा, इसारवाडी फाटा ते अहमदनगरकडे जाणारी जड वाहने आता जालना रोड, करमाड, केंब्रिज चौक, झाल्टा फाटा, अंबिका हॉटेल, सोलापूर-धुळे महामार्गावरून गांधेली, सातारा, ए.एस. क्लब मार्गे अहमदनगर किंवा धुळे, नाशिककडे जातील.
-अहमदनगर, इसारवाडी फाटा, बिडकीन, कचनेर कमान, करमाड मार्गे जालनाकडे जाणारी जड वाहतूक अहमदगनर-पुणे रोडवरील इसारवाडी फाटा, वाळूज, ए.एस. क्लब चौकातून सोलापूर, धुळे महामार्गावरून सातारा, गांधेली, आडगाव, हॉटेल अंबिका, झाल्टा फाटा, केंब्रिज चौक ते जालनाकडे जातील.
-साेलापूर-धुळे मार्गाने कचनेर कमान, पोरगाव फाटा, एल.अँड टी. कंपनी, बिडकीन, शेकटा फाटा, इसारवाडी फाटा ते अहमदनगर पुणेकडे जाणारी जड वाहतूक अहमदनगर पुणे रोडवरील इसारवाडी फाटा, वाळूज, ए.एस. क्लब, सोलापूर-धुळे महामार्गावरून सातारा, गांधेली, निपाणी, कचनेर कमानीकडून सोलापूरकडे जातील.