पर्यटकांना लेण्यांकडे आकर्षित करा -रश्मी वर्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 01:32 AM2018-04-11T01:32:09+5:302018-04-11T11:07:46+5:30

अजिंठा -वेरूळ लेण्यांचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचार-प्रसार करून या लेण्यांकडे देशी-विदेशी पर्यटकांना जास्तीत जास्त प्रमाणात आकर्षित करण्याची आवश्यकता आहे. याच पार्श्वभूमीवर आपण अजिंठा व वेरूळ लेण्यांच्या भेटीवर आलो असल्याचे प्रतिपादन केंद्रीय पर्यटन सचिव रश्मी वर्मा यांनी मंगळवारी अजिंठा लेणी भेटीवर आले असताना केले.

 Attract tourists to the caves - Rushmi Verma | पर्यटकांना लेण्यांकडे आकर्षित करा -रश्मी वर्मा

पर्यटकांना लेण्यांकडे आकर्षित करा -रश्मी वर्मा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
फर्दापूर : अजिंठा -वेरूळ लेण्यांचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचार-प्रसार करून या लेण्यांकडे देशी-विदेशी पर्यटकांना जास्तीत जास्त प्रमाणात आकर्षित करण्याची आवश्यकता आहे. याच पार्श्वभूमीवर आपण अजिंठा व वेरूळ लेण्यांच्या भेटीवर आलो असल्याचे प्रतिपादन केंद्रीय पर्यटन सचिव रश्मी वर्मा यांनी मंगळवारी अजिंठा लेणी भेटीवर आले असताना केले.

मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास रश्मी वर्मा यांचे औरंगाबादहून फर्दापूर -अजिंठा लेणी टी पॉइंट येथे आगमन झाले. सर्वप्रथम त्यांनी येथील कित्येक दिवसांपासून बंद असलेल्या व आजच सुरु करण्यात आलेल्या अजिंठा लेणी ‘व्हिजिटर सेंटर’ला भेट देऊन पाहणी केली. रश्मी वर्मा यांनी लेणी क्र. १, २, १०, १६, १७, २६ ची पाहणी केली. यावेळी औरंगाबाद येथील गाईड पितांबरे यांनी त्यांना लेण्यांची माहिती दिली. यावेळी भारतीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक दिलीप कुमार खमरी, उपअधीक्षक श्रीकांत वाजपेयी, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, सहायक पुरातत्वविद किशोर चलवादी, वरिष्ठ संवर्धन सहायक डी. एस. दानवे, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक उपमहाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल आदींची उपस्थिती होती.

अजिंठा विकास प्रकल्प संघर्ष समितीतर्फे वर्मा यांना लेखी निवेदन देऊन व्हिजिटर सेंटरच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याची व हे सेंटर मागील दहा महिन्यांपासून बंद असल्याची तक्रार करून या संपूर्ण प्रकाराबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी केली.यावर वर्मा यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आश्वासन अजिंठा विकास प्रकल्प संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना देऊन अजिंठा लेणीकडे प्रस्थान केले.

Web Title:  Attract tourists to the caves - Rushmi Verma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.