रूद्राक्षकांच्या मण्यांनी केली भद्रा मारुतीच्या मुर्तीची आकर्षक सजावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 04:22 PM2018-08-25T16:22:50+5:302018-08-25T16:23:39+5:30
मारूतीच्या मुर्तीचा शृगांर तीन पोते रूद्राक्षाकांच्या मण्यांनी करण्यात आला त्यामुळे मुर्ती आकर्षक दिसत होती.
खुलताबाद (औरंगाबाद ) : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या खुलताबाद येथील भद्रा मारूतीच्या दर्शनासाठी आज श्रावणाच्या दुस-या शनिवारी भाविकांनी गर्दी केली. मारूतीच्या मुर्तीचा शृगांर तीन पोते रूद्राक्षाकांच्या मण्यांनी करण्यात आला त्यामुळे मुर्ती आकर्षक दिसत होती.
हिंदू धर्मियांच्या पवित्र श्रावण महिना सुरू झाला असून आज दुसरा श्रावणी शनिवार असल्याने ऱात्रीपासुनच खुलताबाद येथील भद्रा मारूतीच्या दर्शनासाठी औरंगाबाद शहर, जिल्हा, परजिल्हा परिसरातून अनेक भाविक पायी निघाले होते त्यात औरंगाबाद शहरातून येणा-या भाविकांची संख्या लक्षणीय होती. पायी येणा- या भाविकांच्या सोयीसाठी औरंगाबाद ते खुलताबाद मार्गावर ठिकठिकाणी सेवाभावी, सामाजिक संस्थेतर्फे चहापाणी व फराळांची व्यवस्था करण्यात आली होती.
भद्रा मारूतीच्या दर्शनासाठी रात्रीपासुनच भाविक खुलताबादेत दाखल होत होते. जय भद्राचा जयघोष करीत भाविकांंच्या पालखी सवाद्य मिरवणुकीने खुलताबाद शहराच्या चोहोबाजुच्या रस्त्याने येत होत्या. रात्रीपासुनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. पवनपुत्र हनुमान कि जय, बजरंग बली कि जय, भद्रा हनुमान कि जय म्हणत भाविक दर्शन घेत होते. सकाऴनंतर भाविकांच्या गर्दीत वाढ झाली. दिवसभर हनुमानभक्तांची वर्दऴ सुरूच होती. भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले आहे.
औरंगाबाद येथील जयसुख पटेल हे श्रावण महिन्यात जररोज भद्रा मारूतीचा आकर्षक शृगांर करतात त्यातच श्रावणामधील दर शनिवारी वेगवेेगळ्या फऴा-फुलांनी ,मोत्यांनी शृगांर करतात. आज दुस-या शनिवारी औरंगाबाद येथील जयसुख पटेल ,निलेश देशमुख,वल्लभ लढ्ढा,श्रीप्रकाश पुरवार,संजय काळे यांनी तीन पोते रूद्राक्षच्या मन्यांनी व नागवेलीच्या पानांनी आकर्षक शृगांर केला. शनिवार व रविवार दोन दिवस शासकिय सुटी असल्याने भाविकांची मोठी गर्दी आज वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री.घृष्णेश्वर मंदीर व खुलताबाद येथील भद्रा मारूती मंदीरात होती.
मंदिर परिसरात पोलीस निरीक्षक हरीश खेडकर व त्यांचे सहकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला. भाविकांचे सुरऴीत दर्शन व्हावे म्हणून भद्रा मारूती संस्थानचे अध्यक्ष मिठ्ठू पा. बारगळ, सचिव कचरू पा. बारगळ, विश्वस्थ लक्ष्मण फुलारे, लक्ष्मण वरपे, जनसंपर्क अधिकारी राजेंद्र जोंधळे व कर्मचारी पदाधिकारी व स्वंयसेवक परिश्रम घेत आहेत.