बैजू पाटील यांच्या छायाचित्रांचा लंडनमध्ये लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 04:56 AM2018-09-13T04:56:16+5:302018-09-13T04:56:17+5:30
जागतिक व्याघ्र संरक्षण मोहिमेमध्ये भारताला मोठा बहुमान मिळाला आहे.
औरंगाबाद : जागतिक व्याघ्र संरक्षण मोहिमेमध्ये भारताला मोठा बहुमान मिळाला आहे. वन्यजीव छायाचित्रणात ३५ पेक्षा अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांना लंडनमधील रॉयल अल्बर्ट हॉल येथे फोटो प्रदर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
१८ सप्टेंबर ते १४ आॅक्टोबर दरम्यान ‘आय आॅन द टायगर’ या नावाने हे प्रदर्शन भरणार आहे. जागतिक किर्तीच्या १० वन्यजीव छायाचित्रकारांनी टिपलेली वाघांची ८० दुर्मीळ छायाचित्रे या ठिकाणी प्रदर्शित करण्यात येतील. या प्रदर्शनात बैजू यांची ६ छायाचित्रे असतील. जागतिक व्याघ्र संरक्षण मोहिम राबवणाऱ्या ‘द क्लिंटन पार्टनरशिप’ या संस्थेने जगातील १५० श्रीमंत व्यक्तींनाही या प्रदर्शनात आमंत्रित केले आहे.
>करिअरमधील सर्वात सोनेरी क्षण
२५ वर्षांपासून वन्यजीव छायाचित्रणात नावलौकिक मिळवलेल्या बैजू पाटील यांनी रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये आपल्या छायाचित्राचे प्रदर्शन होणे हे करिअरमधील सर्वात सोनेरी क्षण असल्याचे सांगितले. माजी खा. व लोकमतचे चेअरमन विजय दर्डा यांच्या प्रोत्साहनामुळे हे शक्य झाले.
छायाचित्रांच्या लिलावाद्वारे मिळणाºया निधीचा वापर भारतातील व्याघ्र संरक्षण मोहिमेसाठी सुद्धा होणार आहे.