बांधकाम विभागाचे आॅडिट अर्धवट

By Admin | Published: September 6, 2016 12:55 AM2016-09-06T00:55:35+5:302016-09-06T01:06:00+5:30

औरंगाबाद : जिल्ह्यातील ४ ब्रिटिशकालीन पुलांपैकी २ पूल धोकादायक असल्याचा थातुरमातुर अहवाल बांधकाम विभागाने तयार केला.

Audit partial of the construction department | बांधकाम विभागाचे आॅडिट अर्धवट

बांधकाम विभागाचे आॅडिट अर्धवट

googlenewsNext

औरंगाबाद : जिल्ह्यातील ४ ब्रिटिशकालीन पुलांपैकी २ पूल धोकादायक असल्याचा थातुरमातुर अहवाल बांधकाम विभागाने तयार केला. ते पूल पाडून नवीन पूल बांधावे लागतील, असा शेरा अहवालात मारून तो मुख्यालयाकडे पाठविण्यात आला असला तरी जिल्ह्यातील अंतर्गत लहान, जुन्या पुलांकडे विभागाने दुर्लक्ष केल्याने सिल्लोड येथील पूल कोसळल्यामुळे स्पष्ट झाले आहे. 

जुन्या पुलांसंदर्भात जनहित याचिका; २२ ला सुनावणी
सिल्लोड-कन्नड राज्य महामार्ग क्रमांक ५१ वरील मोढावाडीजवळील ४० वर्षे जुना पूल सोमवारी दुपारी अचानक कोसळला. या दुर्घटनेच्या वेळी पुलावरून जात असलेले चार दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले होते. या दुर्घटनेपूर्वी मे. तळेकर अ‍ॅन्ड असोसिएटस् लिटिगेशन लॉ फर्मचे व्यवस्थापकीय भागीदार एस.बी. तळेकर यांनी जुन्या पुलांसंदर्भात औरंगाबाद खंडपीठात ‘जनहित याचिका’ दाखल केली आहे. त्यावर २२ सप्टेंबर २०१६ रोजी सुनावणी होणार आहे.
४न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. संगीतराव पाटील यांच्या खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणीत सरकारी वकिलांनी शासनाच्या वतीने नोटिसा स्वीकारल्या.

Web Title: Audit partial of the construction department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.