औरंगाबादमध्ये सध्या ४९३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 02:39 PM2020-12-16T14:39:46+5:302020-12-16T14:41:03+5:30

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४४,५२२ एवढी झाली आहे. यातील ४२,८५२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत

In Aurangabad, 493 corona patients are currently undergoing treatment | औरंगाबादमध्ये सध्या ४९३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबादमध्ये सध्या ४९३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देमंगळवारी ९३ रुग्णांची वाढ, ६१ रुग्णांना सुटीजिल्ह्यात उपचारादरम्यान २ रुग्णांचा मृत्यू 

औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाच्या ९३ रुग्णांची वाढ झाली, तर उपचार पूर्ण झालेल्या ६१ रुग्णांना सुटी देण्यात आली. तसेच जिल्ह्यातील २ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४४,५२२ एवढी झाली आहे. यातील ४२,८५२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत, तर १,१७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ९३ रुग्णांमध्ये मनपा हद्दीतील ८१, ग्रामीण भागातील १२ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ३७ आणि ग्रामीण भागातील २४ अशा ६१ रुग्णांना मंगळवारी सुटी देण्यात आली. नवनाथनगरातील ७५ वर्षीय स्त्री, गारखेडामधील ७० वर्षीय पुरुष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण
घाटी परिसर २, पेठेनगर १, उस्मानपुरा २, अंगुरीबाग १, न्यू श्रेयनगर १, मिल कॉर्नर १, एसएसी बोर्ड परिसर १, संजयनगर १, एसबी कॉलनी १, शहानूरमियाँ दर्गा परिसर १, एन सहा १, एन चार १, एमजीएम ज्युनिअर कॉलेज परिसर १, कांचनवाडी १, कुंभारवाडा १, छावणी परिसर २, मुकुंदवाडी १, बुढीलेन २, रोकडिया हनुमान कॉलनी १, कासलीवाल मार्बल १, पुष्पानगर १, श्री हरीनगर, गजानन कॉलनी १, एन सात १, एसपीआय सायन्सेस संस्था परिसर १, मयूर पार्क १, माजी सैनिक कॉलनी १, पडेगाव १, ठाकरेनगर १, मयूरबन सो., हडको १, शेंद्रा प्लाझा १, विश्वभारती कॉलनी ३, भानुदासनगर १, स्वातंत्र्यसैनिक कॉलनी १, वर्धमान रेसिडन्सी २, आंबेडकरनगर १, नागेश्वरवाडी २, आनंदवन सो., १, हनुमान मंदिर १, मोहनलालनगर १, मिलिनियम पार्क १, सिंहगड कॉलनी १, बीड बायपास, नाईकनगर १, गजराजनगर १, रेणुकानगर १, गारखेडा परिसर १, जवाहर कॉलनी १, समर्थनगर १, पटेलनगर १, मथुरानगर २, देवळाई १, हडको १,  अन्य २१.

ग्रामीण भागातील रुग्ण
विहामांडवा, पैठण १, पैठण १, खुलताबाद १, अंबेलोहळ, गंगापूर १, बजाजनगर १, वाळूज २, मुर्शिदाबादवाडी, फुलंब्री १, अन्य ४.

Web Title: In Aurangabad, 493 corona patients are currently undergoing treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.