औरंगाबाद @ ८७२ : सात पॉझिटिव्ह रुग्णांचा पत्ता अपूर्ण; प्रशासनाची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 03:57 PM2020-05-16T15:57:12+5:302020-05-16T15:57:31+5:30

दुपारपर्यंत ३० पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ 

Aurangabad @ 872: Address of seven positive patients incomplete; The rush of administration | औरंगाबाद @ ८७२ : सात पॉझिटिव्ह रुग्णांचा पत्ता अपूर्ण; प्रशासनाची धावपळ

औरंगाबाद @ ८७२ : सात पॉझिटिव्ह रुग्णांचा पत्ता अपूर्ण; प्रशासनाची धावपळ

googlenewsNext

औरंगाबाद : शहरात शनिवारी सकाळी २३ रुग्ण आढळून आल्यानंतर आणखी ७ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यामुळे जिल्ह्यात एकुण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८७२ वर गेली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, यातील ७ रुग्णांचा पत्ता अपूर्ण असल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाची धावपळ उडाली आहे.

एमजीएम मेडिकल कॉलेज ३,  हनुमान चौक, चिकलठाणा १, राम नगर ३ , एमआयडीसी १, जालान नगर १, संजय नगर, लेन नं.६ येथे ३, सादात नगर ४, किराडपुरा १, बजाज नगर १, जिन्सी रामनासपुरा १, जुना मोंढा, भवानी नगर, गल्ली नं. ५ येथील १, जहागीरदार कॉलनी १, आदर्श कॉलनी १, रोशन गेट १ या भागातील कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. तर सात रुग्णांचे पत्ते औरंगाबाद म्हणून असल्याने ते रुग्ण नेमक्या कोणत्या भागातील आहे ते कळू शकले नाही. 
 

Web Title: Aurangabad @ 872: Address of seven positive patients incomplete; The rush of administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.