औरंगाबादमध्ये आरटीओ कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन, वाहनधारकांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 01:34 PM2019-02-01T13:34:22+5:302019-02-01T16:12:25+5:30
कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलनामुळे आरटीओ कार्यालयातील विविध काम बंद आहे
औरंगाबाद : परिवहन विभागातील कर्मचारी आकृतीबंध, कार्यालयीन रचनेसह विविध प्रलंबीत मागण्यासाठी औरंगाबाद प्रादेशिक परिवहन कार्यालय कर्मचारी संघटनेतर्फे आज लेखणीबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.
कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलनामुळे आरटीओ कार्यालयातील विविध काम बंद आहे त्यामुळे जिल्हाभरातून आलेल्या वाहनधारकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. दररोज खिडक्यांवर रांगा लागतात मात्र आज खिडक्या सामसूम आहे. कामे होत नसल्याने वाहन चालकांना माघारी फिरावे लागत आहे. संघटनेच्या आंदोलनाला मध्यवर्ती संघटनेने पाठिंबा दिला आहे. कार्यालय मध्ये बैठक घेऊन कर्मचाऱ्यांनी मागण्यांवर चर्चा केली. यावेळी संघटनेचे तुषार बावस्कर, विक्रम राजपूत, रमेश सोमवंशी आदी उपस्थित होते.
पहा व्हिडिओ :