औरंगाबादची लातूरवर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 01:09 AM2017-12-08T01:09:19+5:302017-12-08T01:09:37+5:30
कचनेर येथे आजपासून सुरू झालेल्या राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलींच्या गटात औरंगाबादने लातूर संघावर ५-२ गोल फरकाने मात केली. निर्धारित वेळेत दोन्ही संघ १-१ गोलने बरोबरीत होते. त्यानंतर या सामन्याचा निर्णय टायब्रेकरवर लावण्यात आला. त्यात औरंगाबादकडून पूनम वाणी, अनिता शर्मा, ऐश्वर्या पाडळकर यांनी विजयात निर्णायक भूमिका बजावली, तर लातूरकडून करिश्मा शेखने प्रभावी कामगिरी केली.
औरंगाबाद : कचनेर येथे आजपासून सुरू झालेल्या राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलींच्या गटात औरंगाबादने लातूर संघावर ५-२ गोल फरकाने मात केली. निर्धारित वेळेत दोन्ही संघ १-१ गोलने बरोबरीत होते. त्यानंतर या सामन्याचा निर्णय टायब्रेकरवर लावण्यात आला. त्यात औरंगाबादकडून पूनम वाणी, अनिता शर्मा, ऐश्वर्या पाडळकर यांनी विजयात निर्णायक भूमिका बजावली, तर लातूरकडून करिश्मा शेखने प्रभावी कामगिरी केली.
याच गटातील दुसºया सामन्यात नागपूरने अमरावतीवर २-१ ने मात केली. नागपूरकडून दीक्षा पाचोरे, कांचन खेतडा यांनी, तर अमरावतीकडून तनुश्री कुडाळने गोल केला.
मुलांच्या गटात नागपूर, कोल्हापूर आणि मुंबई संघांनी विजय मिळवला. नागपूर विभागाने नाशिक विभागाचा ३-० गोलने पराभव केला. त्यांच्याकडून हिमेश खानने २, तर राज सोमलवारने १ गोल केला. दुसºया सामन्यात कोल्हापूरने लातूरवर ५-० अशी मात केली. कोल्हापूरकडून महेश कदमने २, नितीन पाटीलने १ व दीपक कदम, अजय कदम यांनी प्रत्येकी १ गोल केला. तिसºया सामन्यात मुंबईने अमरावतीवर ५-२ अशी मात केली. मुंबईकडून सन पीटरने २, तर दर्शन अंगवेकर व भीम भल्ला आणि टीकाराम यांनी प्रत्येकी १ गोल केला. अमरावतीकडून मोहंमद साद व जाहेद खान यांनी प्रत्येकी १ गोल केला. पंच म्हणून नितीन शाह, अरुण सिंग, मोहमद वसीम, धीरज चव्हाण, अकबर खान, अब्दुल हक, शेख अमान, शेख जाहेद, समीर शेख, संजय तोटावाड व इम्रान शेख यांनी काम पाहिले.