औरंगाबाद 'मध्य'चे चित्र बदलले, १५ व्या फेरीत 'MIM'चे नासेर सिद्दीकी आघाडीवर, जैस्वाल मागे

By संतोष हिरेमठ | Published: November 23, 2024 02:27 PM2024-11-23T14:27:35+5:302024-11-23T14:30:21+5:30

९ व्या फेरीनंतर नासेर सिद्दीकी यांच्या मतांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली, १५ व्या फेरीत त्यांनी आघाडी घेतली

Aurangabad Central picture changed, 'MIM's Nasser Siddiqui leads, Pradeep Jaiswal behind in 15th round | औरंगाबाद 'मध्य'चे चित्र बदलले, १५ व्या फेरीत 'MIM'चे नासेर सिद्दीकी आघाडीवर, जैस्वाल मागे

औरंगाबाद 'मध्य'चे चित्र बदलले, १५ व्या फेरीत 'MIM'चे नासेर सिद्दीकी आघाडीवर, जैस्वाल मागे

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या  फेरीत सगळे चित्र बदलले. 'एमआयएम'चे नासेर सिद्दीकी यांनी आघाडी घेतली, तर शिंदेंसेनेचे प्रदीप जैस्वाल दुसऱ्या स्थानी गेले.

'मध्य'मध्ये १५ व्या फेरीअखेरपर्यंत शिंदेंसेनेचे प्रदिप जैस्वाल यांना ५० हजार ७६८ मते मिळाली आहेत. तर 'एमआयएम' चे नासेर सिद्दीकी यांना  ५४ हजार ८६७ आणि उध्दवसेनेचे बाळासाहेब थोरात यांना २१ हजार ७३२ मते मिळाली आहेत. प्रदीप जैस्वाल हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते. परंतु  १४ व्या फेरीपर्यंत २६ हजारांवरून १,७६० मतांनी आघाडीवर आले. १५ व्या फेरीत नासेर सिद्दीकी यांनी आघाडी घेत जैस्वाल यांना मागे टाकले.

'मध्य'मधील एकूण २ लाख १८ हजार ९६६ मतदान असून, १४ व्या फेरीपर्यंत एकूण  १ लाख ३१ हजार १९० मतमोजणी पूर्ण झाली. शिंदेंसेनेचे प्रदिप जैस्वाल यांना ५० हजार ९६ मते मिळावी आहेत. तर 'एमआयएम' चे नासेर सिद्दीकी यांना ४८ हजार ३३६ आणि उध्दवसेनेचे बाळासाहेब थोरात याना २१ हजार २५० मते मिळाली आहेत. प्रदीप जैस्वाल हे १,७६० मतांनी आघाडीवर आहेत.

मतमोजणीच्या ८ व्या फेरीपर्यंत नासेर सिद्दीकी हे तिसऱ्या स्थानी होते. तर उध्दवसेनेचे बाळासाहेब थोरात हे दुसऱ्या स्थानी होते. प्रदीप जैस्वाल हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर आहेत. मात्र, ९ व्या फेरीनंतर नासेर सिद्दीकी यांच्या मतांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली. या फेरीत नासेर सिद्दीकी यांनी बाळासाहेब थोरात यांना मागे टाकत दुसरा क्रमांक गाठला. ८ व्या फेरीपर्यंत जैस्वाल हे २६ हजार १३७ मतांनी आघाडीवर होते. त्यानंतर त्यांचे मताधिक्य घटले.

Web Title: Aurangabad Central picture changed, 'MIM's Nasser Siddiqui leads, Pradeep Jaiswal behind in 15th round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.