औरंगाबाद शहर ९० टक्के कचरामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 12:23 AM2018-05-01T00:23:49+5:302018-05-01T00:24:39+5:30

अवघ्या दहा दिवसांमध्ये शहरातील संपूर्ण कचरा उचलण्यात येईल, असा शब्द महापौर नंदकुमार घोडेले यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला होता. त्यानुसार रविवारी ही मुदत संपली. शहर ९० टक्के कचरामुक्त झाले असून, संपूर्ण कचरा उचलण्यात आल्याचा दावा महास्वच्छता अभियानाच्या निमित्ताने महापौर, उपमहापौरांनी केला.

Aurangabad city has 90 percent garbage free | औरंगाबाद शहर ९० टक्के कचरामुक्त

औरंगाबाद शहर ९० टक्के कचरामुक्त

googlenewsNext
ठळक मुद्देपदाधिकाऱ्यांचा दावा : महास्वच्छता अभियान, नागरिकांनी कचरा टाकू नये

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : अवघ्या दहा दिवसांमध्ये शहरातील संपूर्ण कचरा उचलण्यात येईल, असा शब्द महापौर नंदकुमार घोडेले यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला होता. त्यानुसार रविवारी ही मुदत संपली. शहर ९० टक्के कचरामुक्त झाले असून, संपूर्ण कचरा उचलण्यात आल्याचा दावा महास्वच्छता अभियानाच्या निमित्ताने महापौर, उपमहापौरांनी केला. नागरिक पुन्हा त्याच ठिकाणी नवीन कचरा आणून टाकत आहेत. यानंतर दंडात्मक कारवाईचा बडगा महापालिका उगारणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
मागील ७३ दिवसांपासून शहरात कचराकोंडी सुरू आहे. कचराकोंडीची वाटचाल आता शंभरीकडे सुरू आहे. कचरा प्रश्नाची दखल पंधरा दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही घेतली. महापौर घोडेले यांनी त्यांना शब्द दिला होता की, दहा दिवसांमध्ये शहरातील संपूर्ण कचरा उचलण्यात येईल. चिकलठाणा आणि हर्सूल येथे सुमारे पंधराशे टन कचरा नेऊन टाकण्यात आला. याशिवाय मध्यवर्ती जकात नाका येथेही कचरा साठवून ठेवला आहे. शहरात ज्याठिकाणी सर्वाधिक मोठे कचºयाचे डोंगर होते ते नाहीसे करण्यात मनपाला यश आले आहे. प्रभाग १, २ आणि ३ मध्ये आजही सर्वाधिक कचरा पडून आहे.
रविवारी सकाळी औरंगपुरा येथे महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी तथा प्रभारी मनपा आयुक्त उदय चौधरी, उपमहापौर विजय औताडे, सभापती गजानन बारवाल, सभागृह नेते विकास जैन, नगरसेविका कीर्ती शिंदे, अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, शहर अभियंता एस. डी. पानझडे, सिकंदर अली यांची प्रमुख उपस्थित होती. औरंगपुरा भाजीमंडई रोडपर्यंत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. महापालिकेच्या वेगवेगळ्या नऊ झोनमध्येही अशाच पद्धतीने मोहीम राबविण्यात आली.
मोहीम संपल्यावर पत्रकारांसोबत बोलताना महापौर घोडेले यांनी आपण दिलेला शब्द पाळला असून, यापुढे शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी मनपासोबतच शहरातील प्रत्येक नागरिकांचीही आहे. त्यांनी मनपाला सहकार्य करायला हवे. कुठेही कचरा टाकू नये. अन्यथा मनपाला दंडात्मक कारवाईचा बडगा उगारावा लागेल. जोपर्यंत शहराला शिस्त लागणार नाही, तोपर्यंत कचºयाचा प्रश्न संपणार नाही. मनपाने कधीची जबाबदारी झटकलेली नाही. नऊ झोनमध्ये यंत्रणा उभी राहणे, कचºयाचा केंद्रीय प्रकल्प उभा होईपर्यंत ही स्थिती राहिल.या स्थितीतून मार्ग काढण्याचे काम प्रशासन करीतेय असे नमूद केले.
व्यापाºयांना सरसकट दंड आकारणार
बाजारपेठेतील प्रमुख रस्त्यांवर दररोज रात्री शेकडो टन सुका कचरा पडून असतो. कोणत्याही व्यापाºयाकडे कचरा साठविण्यासाठी डसबिन नाही. मनपाच्या वाहनांमध्ये कचरा टाकण्याचे सोडून व्यापारी खुशाल रात्री रस्त्यावर कचरा आणून टाकतात. कुंभारवाड्यात तर नागरिकही रस्त्यावरच कचºयाच्या कॅरिबॅग ठेवतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी व्यापाºयांना सरसकट दंड लावण्याचा निर्णय मनपाने घेतला असून, दंड लावणाºया पथकाला दररोज दोन लाखांचे उद्दिष्ट देण्यात येईल.
टिळकपथ, गुलमंडी, रंगारगल्ली, सिटीचौक, शहागंज, गोमटेश मार्केट आदी भागात रात्री १० नंतर कॅरिबॅग, कागदी पुठ्ठे, विविध मालांवरील पातळ कॅरिबॅग रस्त्यावर फेकून देण्यात येते. व्यापाºयांनीच कचरा रस्त्यावर टाकल्यास शहर कसे स्वच्छ होईल, असा प्रश्न मनपा पदाधिकाºयांनी उपस्थित केला आहे. प्रत्येक दुकानदाराने सुका कचरा ठेवण्यासाठी डसबिन ठेवल्याच पाहिजे. सकाळी आणि संध्याकाळी मनपाच्या घंटागाडीकडे हा कचरा दिला पाहिजे. व्यापाºयांच्या सोयीसाठी दोनवेळा कचरा उचलण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यानंतरही कचरा रस्त्यावर येत असेल तर ही फार गंभीर बाब असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे यांनी नमूद केले.
शहरात कचºयाची परिस्थिती गंभीर आहे, अशा परिस्थितीत महापालिका शहर सुंदर, स्वच्छ कसे राहील यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांना खीळ बसविण्याचे काम व्यापाºयांकडून होत आहे. व्यापाºयांना शिस्त लावण्यासाठी प्रत्येक दुकानदाराला दोन हजार रुपये दंड आकारण्यात यावा, असा निर्णय महापौरांनी घेतला. अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना स्वतंत्र पथक नेमून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. पथकाने दररोज किमान दोन लाख रुपये दंड वसूल करावा, असे निर्देशही यावेळी देण्यात आले. निधी मनपाच्या तिजोरीत आला पाहिजे असेही पदाधिकाºयांनी शेवटी नमूद केले.औरंगाबाद शहर ९० टक्के कचरामुक्त
पदाधिकाºयांचा दावा : महास्वच्छता अभियान, नागरिकांनी कचरा टाकू नये
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : अवघ्या दहा दिवसांमध्ये शहरातील संपूर्ण कचरा उचलण्यात येईल, असा शब्द महापौर नंदकुमार घोडेले यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला होता. त्यानुसार रविवारी ही मुदत संपली. शहर ९० टक्के कचरामुक्त झाले असून, संपूर्ण कचरा उचलण्यात आल्याचा दावा महास्वच्छता अभियानाच्या निमित्ताने महापौर, उपमहापौरांनी केला. नागरिक पुन्हा त्याच ठिकाणी नवीन कचरा आणून टाकत आहेत. यानंतर दंडात्मक कारवाईचा बडगा महापालिका उगारणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
मागील ७३ दिवसांपासून शहरात कचराकोंडी सुरू आहे. कचराकोंडीची वाटचाल आता शंभरीकडे सुरू आहे. कचरा प्रश्नाची दखल पंधरा दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही घेतली. महापौर घोडेले यांनी त्यांना शब्द दिला होता की, दहा दिवसांमध्ये शहरातील संपूर्ण कचरा उचलण्यात येईल. चिकलठाणा आणि हर्सूल येथे सुमारे पंधराशे टन कचरा नेऊन टाकण्यात आला. याशिवाय मध्यवर्ती जकात नाका येथेही कचरा साठवून ठेवला आहे. शहरात ज्याठिकाणी सर्वाधिक मोठे कचºयाचे डोंगर होते ते नाहीसे करण्यात मनपाला यश आले आहे. प्रभाग १, २ आणि ३ मध्ये आजही सर्वाधिक कचरा पडून आहे.
रविवारी सकाळी औरंगपुरा येथे महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी तथा प्रभारी मनपा आयुक्त उदय चौधरी, उपमहापौर विजय औताडे, सभापती गजानन बारवाल, सभागृह नेते विकास जैन, नगरसेविका कीर्ती शिंदे, अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, शहर अभियंता एस. डी. पानझडे, सिकंदर अली यांची प्रमुख उपस्थित होती. औरंगपुरा भाजीमंडई रोडपर्यंत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. महापालिकेच्या वेगवेगळ्या नऊ झोनमध्येही अशाच पद्धतीने मोहीम राबविण्यात आली.
मोहीम संपल्यावर पत्रकारांसोबत बोलताना महापौर घोडेले यांनी आपण दिलेला शब्द पाळला असून, यापुढे शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी मनपासोबतच शहरातील प्रत्येक नागरिकांचीही आहे. त्यांनी मनपाला सहकार्य करायला हवे. कुठेही कचरा टाकू नये. अन्यथा मनपाला दंडात्मक कारवाईचा बडगा उगारावा लागेल. जोपर्यंत शहराला शिस्त लागणार नाही, तोपर्यंत कचºयाचा प्रश्न संपणार नाही. मनपाने कधीची जबाबदारी झटकलेली नाही. नऊ झोनमध्ये यंत्रणा उभी राहणे, कचºयाचा केंद्रीय प्रकल्प उभा होईपर्यंत ही स्थिती राहिल.या स्थितीतून मार्ग काढण्याचे काम प्रशासन करीतेय असे नमूद केले.
व्यापाºयांना सरसकट दंड आकारणार
बाजारपेठेतील प्रमुख रस्त्यांवर दररोज रात्री शेकडो टन सुका कचरा पडून असतो. कोणत्याही व्यापाºयाकडे कचरा साठविण्यासाठी डसबिन नाही. मनपाच्या वाहनांमध्ये कचरा टाकण्याचे सोडून व्यापारी खुशाल रात्री रस्त्यावर कचरा आणून टाकतात. कुंभारवाड्यात तर नागरिकही रस्त्यावरच कचºयाच्या कॅरिबॅग ठेवतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी व्यापाºयांना सरसकट दंड लावण्याचा निर्णय मनपाने घेतला असून, दंड लावणाºया पथकाला दररोज दोन लाखांचे उद्दिष्ट देण्यात येईल.
टिळकपथ, गुलमंडी, रंगारगल्ली, सिटीचौक, शहागंज, गोमटेश मार्केट आदी भागात रात्री १० नंतर कॅरिबॅग, कागदी पुठ्ठे, विविध मालांवरील पातळ कॅरिबॅग रस्त्यावर फेकून देण्यात येते. व्यापाºयांनीच कचरा रस्त्यावर टाकल्यास शहर कसे स्वच्छ होईल, असा प्रश्न मनपा पदाधिकाºयांनी उपस्थित केला आहे. प्रत्येक दुकानदाराने सुका कचरा ठेवण्यासाठी डसबिन ठेवल्याच पाहिजे. सकाळी आणि संध्याकाळी मनपाच्या घंटागाडीकडे हा कचरा दिला पाहिजे. व्यापाºयांच्या सोयीसाठी दोनवेळा कचरा उचलण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यानंतरही कचरा रस्त्यावर येत असेल तर ही फार गंभीर बाब असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे यांनी नमूद केले.
शहरात कचºयाची परिस्थिती गंभीर आहे, अशा परिस्थितीत महापालिका शहर सुंदर, स्वच्छ कसे राहील यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांना खीळ बसविण्याचे काम व्यापाºयांकडून होत आहे. व्यापाºयांना शिस्त लावण्यासाठी प्रत्येक दुकानदाराला दोन हजार रुपये दंड आकारण्यात यावा, असा निर्णय महापौरांनी घेतला. अतिरिक्त

Web Title: Aurangabad city has 90 percent garbage free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.