औरंगाबाद शहरातील हॉटेल, टॅक्सी व्यवसायाला बसेल फटका; ट्रूजेट : डिसेंबरमध्ये १६ दिवस उड्डाण रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 01:01 AM2017-11-27T01:01:31+5:302017-11-27T01:01:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ट्रूजेटचे विमान डिसेंबरमध्ये आठवड्यातून तीनच दिवस उड्डाण करणार आहे. महिन्यातील तब्बल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ट्रूजेटचे विमान डिसेंबरमध्ये आठवड्यातून तीनच दिवस उड्डाण करणार आहे. महिन्यातील तब्बल १६ दिवस या विमानाचे उड्डाण होणार नसल्याने हॉटेल्स, टूर्स आणि टॅक्सी व्यवसायावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
डिसेंबरमध्ये आठवड्यातील बुधवार, गुरुवार आणि रविवार या तीन दिवशीच विमानाचे उड्डाण करण्याचे नियोजन ट्रूजेट कंपनीतर्फे करण्यात आले आहे. त्यामुळे या महिन्यात केवळ १४ दिवसच विमानाचे उड्डाण होणार आहे. जानेवारीपासून उड्डाणाचे नियोजन सुरळीत होईल की,असेच राहील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही; परंतु डिसेंबरमधील या नियोजनाने इतर व्यवसायांना फटका बसणार आहे. हे नियोजन पुढे कायम राहिल्यास अधिक झळ बसण्याची शक्यता नाकारता (पान २ वर)
ट्रूजेटचे ७२ आसनी विमान आहे. या विमानसेवेला भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. त्यामुळे विमान कायम भरलेले असते. डिसेंबरमध्ये १६ दिवस विमानाचे उड्डाण होणार नसल्याने ५० प्रवाशांच्या हिशेबाने किमान ८०० प्रवासी शहरात येणार नाही. त्याचा परिणाम हॉटेल, टूर्स टॅक्सी व्यवसायावर होईल,असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.