औरंगाबाद शहर ‘सुरत प्लेग’च्या दिशेने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:17 AM2018-03-17T00:17:14+5:302018-03-17T00:17:32+5:30
पर्यटनाची राजधानी आणि औद्योगिकनगरी औरंगाबाद शहरात मागील एक महिन्यापासून शहरात हजारो मेट्रिक टन कचरा साचला आहे. हा कचरा कुजत असून, त्यातून प्रचंड दुर्गंधी निर्माण झाली आहे. त्यातच शुक्रवारी हलक्या पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत. त्यामुळे शहरात १९९४ मध्ये सुरतमध्ये पसरलेल्या प्लेगसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी शंका शहरातील डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
मुजीब देवणीकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : पर्यटनाची राजधानी आणि औद्योगिकनगरी औरंगाबाद शहरात मागील एक महिन्यापासून शहरात हजारो मेट्रिक टन कचरा साचला आहे. हा कचरा कुजत असून, त्यातून प्रचंड दुर्गंधी निर्माण झाली आहे. त्यातच शुक्रवारी हलक्या पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत. त्यामुळे शहरात १९९४ मध्ये सुरतमध्ये पसरलेल्या प्लेगसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी शंका शहरातील डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
शहरात दररोज ४०० ते ४५० मेट्रिक टन कचरा जमा होतो. यातील ३० ते ४० टक्के कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात महापालिकेच्या काही झोन कार्यालयांना यश येत आहे. उर्वरित कचरा शहरातील मुख्य रस्ते, नाले, रिकाम्या प्लॉटवर पडून आहे. दररोज ३०० मेट्रिक टन कचरा गृहीत धरल्यास सध्या शहरात ७ हजारांहून अधिक मेट्रिक टन कचरा साचला आहे. साचलेला कचरा कमी होण्याऐवजी दररोज त्यात वाढच होत आहे. कचºयातून प्रचंड दुर्गंधी येत असल्याने नागरिक परस्पर कचरा जाळून टाकत आहेत.
जळालेल्या कचºयावर ठिकठिकाणी अग्निशमन दलाकडून पाणी मारून आग विझविण्यात येत आहे. यावर परत नवीन कचरा येऊन पडत आहे. जुना कचरा, त्यावर पाण्याचा मारा आणि नवीन कचरा या तिहेरी प्रक्रियेने कचरा कुजण्याचे प्रकार सुरू झालेत. ही परिस्थिती अत्यंत विदारक आहे. कचºयात मरण पावलेले उंदीर असल्यास त्यातून पिसा जन्माला येतात. त्या प्लेग जन्माला घालतात. प्लेग हा आजार संसर्गजन्य असून, सुरत शहरात १९९४ मध्ये अशाच पद्धतीने उद्रेक झाला होता. शेकडो नागरिकांना यात जीव गमवावा लागला होता.
औरंगाबाद शहरातील कचºयाची गंभीर परिस्थिती पाहून तज्ज्ञ डॉक्टरांना प्लेगसारखी साथ पसरण्याची भीती वाटू लागली आहे. प्लेग हा संसर्गजन्य आजार पसरल्यास तो आटोक्यात आणणे सहजासहजी शक्य होत नाही. १९९४ मध्ये प्लेग अटोक्यात आण्यासाठी खूप औषधी नव्हती. आज औषधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, असेही तज्ज्ञांनी नमूद केले.
कचºयाचा फुगा कोणी फुगविला
४१६ फेब्रुवारीपासून शहरात कचरा साचला आहे. सुरुवातीचे काही दिवस मनपाने कचरा उचलण्याकडे अजिबात लक्ष दिले नाही. नारेगावच्या आंदोलकांसोबत बोलणी करण्यातच वेळ वाया घालविला. जेव्हा बोलणी अयशस्वी झाली तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेलेली होती. हजारो मेट्रिक टन कचरा शहरात साचल्यावर मनपा भानावर आली.
मृत प्राणी कचºयात
शहरात ज्या भागात कचºयाचे डोंगर साचले आहेत, त्या कचºयात मरण पावलेले प्राणी आणून टाकण्यात आले आहेत. यातून रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे.