औरंगाबादेत चमकोगिरी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 12:26 AM2018-02-28T00:26:15+5:302018-02-28T00:26:21+5:30
चौकाचौकात होर्डिंग्ज लावून फुकटछाप चमकोगिरी करणाºयांविरुद्ध महापालिका का कारवाई करत नाही, असा सवाल आता नागरिक विचारत आहेत. दोन दिवसांपूर्वी शहरात होर्डिंग फाडल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शहराला विद्रूप करणाºया होर्डिंग्जवर कारवाईचे आदेश यापूर्वी न्यायालयाने दिले आहेत. नुकतेच पोलीस आयुक्तांनीही या संदर्भात मनपाने कारवाई करावी यासाठी पत्र लिहिले आहे; पण अजूनही काही चौकांत अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर जसेच्या तसे आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : चौकाचौकात होर्डिंग्ज लावून फुकटछाप चमकोगिरी करणाºयांविरुद्ध महापालिका का कारवाई करत नाही, असा सवाल आता नागरिक विचारत आहेत. दोन दिवसांपूर्वी शहरात होर्डिंग फाडल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शहराला विद्रूप करणाºया होर्डिंग्जवर कारवाईचे आदेश यापूर्वी न्यायालयाने दिले आहेत. नुकतेच पोलीस आयुक्तांनीही या संदर्भात मनपाने कारवाई करावी यासाठी पत्र लिहिले आहे; पण अजूनही काही चौकांत अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर जसेच्या तसे आहेत.
अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. यासंदर्भात पोलीस आयुक्तांचे पत्र मनपा आयुक्तांकडे गेले आहे. गेल्या काही दिवसांत शहरातील अनेक चौक ‘भाऊ, दादा, भय्या, भाई’च्या पोस्टरपासून मुक्त झाल्याचे दिसून आले. मात्र, काही चौकात अजूनही होर्डिंग्ज, बॅनर दिसत आहेत. पद्मपुºयातील अहिल्याबाई होळकर चौकात एका बाजूला अजूनही दिवाळीच्या शुभेच्छा देणारे बॅनर झळकतेय. क्रांतीनगरातही ‘भाई-भाई’चे वाढदिवसाचे बॅनर, नारळीबाग येथे राजकीय पक्षाचे बॅनर, घाटीत मुख्यद्वारातून आत प्रवेश करताच समोर मोठे डिजिटल बॅनर, विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोरील चौकात एक होर्डिंग, सिडकोतील आविष्कार कॉलनी चौकात होर्डिंग दिसून आले. या पोस्टर बॉयवर मनपा कारवाई का करत नाही, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
मनपाचे दुर्लक्ष
अनधिकृत होर्डिंग्जकडे महानगरपालिकेचे नेहमीच दुर्लक्ष असते. पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाºया औरंगाबाद शहराचे विद्रुपीकरण यामुळे होत आहे. ‘स्वच्छ शहरा’च्या अभियानात होर्डिंग्जची फुकटछाप चमकोगिरी मोठी अडसर ठरत आहे.