सोशल मीडियावर मैत्री करून २१ लाखाची फसवणूक करणारा दिल्लीतून ताब्यात, औरंगाबाद सायबर पोलिसांनी कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2021 07:12 PM2021-11-03T19:12:45+5:302021-11-03T19:13:56+5:30
जर्मनीमधून बोलत असल्याचे भासवून केली फसवणूक
औरंगाबाद: जर्मनीमधून बोलत असल्याचे भासवून सोशल मिडीयावर मैत्री करून २१ लाख ५०,३५५ रूपयांची आर्थिक फसवणूक करणारा आंतरराष्ट्रीय व अंतरराजीय गुन्हेगार दिल्लीत औरंगाबाद सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केला आहे.
आशिषकुमार भगवानदीप मौर्य (२१, रा. ढेबरीया राऊत, ता. हरैय्या, उत्तरप्रदेश, ह. मु. चंदन गौरीशंकर साहु, पश्चिम दिल्ली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सोशल मिडीयावर मैत्री करून २१लाख ५०,३५५ रूपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्याविरूद्ध सिडको पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. प्रकरण अत्यंत गुंता गुंतीचे असल्याने पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांच्या टीमला सोपविले. त्यांच्या टीममधील सहायक पोलीस निरीक्षक अमोल सातोदकर, पोलीस उपनिरीक्षक राहुल चव्हाण यांनी अभ्यास करून इतर कर्मचाऱ्यासह दिल्ली गाठली. दिल्लीत राहून हा आरोपी महागडे गिफ्ट महिलेला पाठवून मैत्री केली होती. त्याचे ठिकाण पथकाने शोधले. पाठलाग करत अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
या पथकांने केली कामगिरी...
सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गौतम पातारे, सहायक पोलीस निरीक्षक अमोल सातोदकर, पोलीस उपनिरीक्षक राहुल चव्हाण, पोहेकॉ वारे, सविता तांबे, खरे, साबळे, गोकुळ कुरतवाडे, अमोल सोनटक्के, रवि पोळ, सुशांत शेळके, मन्सूर शहा, विजय घुगे, वैभव वाघचौरे, राम काकडे, रियाज शेख, शिल्पा तेलोरे, संगिता दुबे, सोनाली वडनेरे इत्यादीच्या सायबर पोलीस पथकांने केली.