औरंगाबादेत ब्रह्मवृंदांची भक्ती, एकी, शिस्तीची अनुभूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 12:39 AM2018-04-19T00:39:17+5:302018-04-19T00:40:10+5:30

बहुभाषिक ब्राह्मणांची एकी, भक्ती, शिस्तीची अनुभूती भगवान परशुराम जन्मोत्सवाच्या शोभायात्रेत आली. बुधवारी सायंकाळी निघालेल्या शोभायात्रेत युवक-युवतींच्या ७ ढोलपथकांनी तर शहर दणाणून सोडले. मागील पाच वर्षांतील गर्दीचे विक्रम या शोभायात्रेने मोडीत काढले. एक लक्षवेधी, नियोजनबद्ध शोभायात्रा, पाहण्यात आल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.

In Aurangabad, the devotees of the Brahmavidas, Ekki, disciplined experience | औरंगाबादेत ब्रह्मवृंदांची भक्ती, एकी, शिस्तीची अनुभूती

औरंगाबादेत ब्रह्मवृंदांची भक्ती, एकी, शिस्तीची अनुभूती

googlenewsNext
ठळक मुद्देढोलपथकाचा दणदणाट : भगवान परशुराम जन्मोत्सव शोभायात्रा लक्षवेधी; पाच तास चालला जल्लोष

लोकमत न्यूज नेटवर्क
औैरंगाबाद : बहुभाषिक ब्राह्मणांची एकी, भक्ती, शिस्तीची अनुभूती भगवान परशुराम जन्मोत्सवाच्या शोभायात्रेत आली. बुधवारी सायंकाळी निघालेल्या शोभायात्रेत युवक-युवतींच्या ७ ढोलपथकांनी तर शहर दणाणून सोडले. मागील पाच वर्षांतील गर्दीचे विक्रम या शोभायात्रेने मोडीत काढले. एक लक्षवेधी, नियोजनबद्ध शोभायात्रा, पाहण्यात आल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.
ब्राह्मण समाज समन्वय समितीअंतर्गत भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीने राजाबाजार येथून शोभायात्रा काढण्यात आली. ‘विष्णू के छठे अवतार परशुराम की जयजयकार’ अशा गगनभेदी जयघोषाने वातावरण दुमदुमले होते. तरुणाईचा जोश, जल्लोष कसा असतो ते आजच्या शोभायात्रेत अनेकांनी ‘याचि देही, याचि डोळा’ अनुभवला. ब्रह्मगर्जना या ढोलपथकाने नावाप्रमाणेच जोरदार ढोलवादन करून भगवान परशुरामाचा गजर केला. पोपटी रंगाचा कुर्ता, पांढरा पायजामा व अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ ‘जय परशुराम’ असे लिहिलेल्या टोप्या, असा गणवेश या ढोलपथकाचा होता. चॉकलेटी रंगाचा कुर्ता व पांढरा फेटा बांधलेले १८० युवक-युवतींच्या ‘ब्रह्मनाद’ या जम्बो ढोलपथकाने ‘एकही नारा, जय श्रीराम’ अशी गर्जना करीत तुफान ढोलवादन करून सर्वांना थकीत केले, तसेच सोनेरी कुर्ता व लाल धोतर परिधान केलेल्या ‘ब्रह्मास्त्र’ ढोलपथकानेही ढोलवादनासोबत लाठी, तलवारबाजीचे थरारक प्रात्यक्षिक दाखवून सर्वांची दाद मिळविली.


याशिवाय नादगंधर्व ढोलपथक, ब्रह्मशौर्य ढोलपथकानेही तेवढ्याच दमदारपणे ढोलवादन करून दणदणाट निर्माण केला. भार्गव केसरी वाद्य पथकात पारंपरिक वेशभूषेतील तरुणी व महिलांनी लेझीमचे उत्तम सादरीकरण केले. सर्व ढोलपथकांना संधी मिळावी यासाठी शोभायात्रा मार्गावर क्रमांकानुसार जागा निवडून दिल्या होत्या. त्या ठिकाणी २० मिनिटात आपले ढोलवादन पार पाडणे बंधनकारक होते. त्यानुसारच शिस्तीचे दर्शन ढोलपथकांनी घडविले. खऱ्याअर्थाने युवक-युवतींच्या ढोलपथकांमुळे शोभायात्रेची शोभा वाढली. शोभायात्रेत खा.चंद्रकांत खैरे, आ. अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले, प्रदीप जैस्वाल, किशनचंद तनवाणी, शिरीष बोराळकर, राजू वैद्य, मकरंद कुलकर्णी, बंडू ओक, प्रफुल्ल मालानी आदी लोकप्रतिनिधी हजर होते. यशस्वीतेसाठी समितीचे अध्यक्ष अनिल पैठणकर, प्रकल्प प्रमुख आशिष सुरडकर, तसेच सुरेश देशपांडे, मिलिंद दामोदरे, आनंद तांदुळवाडीकर, धनंजय पांडे, प्रमोद झाल्टे, अनिल खंडाळकर, सचिन वाडेपाटील, सुभाष बिंदू, राजेंद्र कुलकर्णी, अतुल जोशी, नीलेश सातोनकर, आर.बी. शर्मा, सतीश उपाध्याय, मिलिंद पिंपळे, मंगेश पळसकर, जीवन कुलकर्णी, संजय पांडे, विजया कुलकर्णी, मीनाक्षी देशपांडे, वनीता पत्की, गीता आचार्य, शुभांगी कुलकर्णी, अनुराधा पुराणिक, अंजली गोरे, स्मिता दंडवते,
नीता पानसरे, विजया अवस्थी, विनिता हर्सूलकर यांच्यासह सर्व पदाधिकारी, समाजबांधवांनी परिश्रम घेतले.
संतांची उपस्थिती
शोभायात्रेत साधू-संतांच्या उपस्थितीने सर्वांचा आनंद द्विगुणित झाला. पहिल्या रथात आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज व योगिराज गोसावी पैठणकर महाराज विराजमान होते. दुसºया रथात माई महाराज विराजमान होत्या, तर तिसºया रथात चार वेदाचे पंडित, घनपाठी बसले होते.
परशुरामाच्या मूर्तीने लक्ष वेधले
राजस्थानी विप्र मंडळाच्या वतीने ८ फूट उंचीची भगवान परशुरामाची भव्य मूर्ती शोभायात्रेत सर्वांचे आकर्षण ठरली. मंगलकलश डोक्यावर घेऊन या मंडळाच्या महिला सहभागी झाल्या होत्या. उत्तरदेशीय ब्राह्मण सेवा समितीच्या वतीने सुंदर सजविलेली पालखी ज्यात परशुरामाची प्रतिमा ठेवण्यात आली होती. ही पालखीही लक्षवेधी ठरली.
चित्ररथाचेही आकर्षण
एका रथात सोहम पटवारी व वेद जोशी या बालकांनी परशुरामाची वेशभूषा केली होती. याशिवाय रेणुकामातेच्या मंदिराचा देखावा एका चित्ररथात होता. विश्व ब्राह्मण सेवाभावी संस्था व कण्व ब्राह्मण समाजाच्या चित्ररथात उपक्रमाची माहिती देण्यात आली होती. राघवेंद्र सेवा संघाचा चित्ररथही लक्षवेधी ठरला. सर्व शाखीय ब्राह्मण सभा, बेगमपुरातील महिलांनी हातात ब्राह्मण समाजातील विविध पोटजातीचे फलक घेतले होते. कुलस्वामिनी प्रतिष्ठानतर्फे परशुरामाची इकोफ्रेंडली प्रतिमा तयार केली होती.

Web Title: In Aurangabad, the devotees of the Brahmavidas, Ekki, disciplined experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.