औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे खेळाडूंना मोफत प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:51 AM2018-01-19T00:51:20+5:302018-01-19T00:51:30+5:30
औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे १६ व १९ वर्षांखालील मुलींना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे १६ व १९ वर्षांखालील मुलींना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
ऐतिहासिक औरंगाबाद शहराला प्रतिभावान महिला क्रिकेटपटूंची परंपरा आहे. शहराने महाराष्ट्राला अनेक दर्जेदार खेळाडू दिले आहे. विशेष म्हणजे औरंगाबाद येथील श्वेता जाधव हिने २१ वर्षांखालील आशियाई क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच तिच्यासह सध्या प्रियंका गारखेडे, श्वेता माने या सध्या महाराष्ट्राच्या सीनिअर संघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. या शहरातून आणखी महिला क्रिकेटपटू घडाव्यात या दृष्टिकोनातून जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे १६ व १९ वर्षांखालील मुलींना प्रशिक्षण दिले जाणार आहे. या खेळाडूंना औरंगाबादचे सीनिअर क्रिकेटपटू व प्रशिक्षक शेख हबीब यांचे मार्गदर्शन लाभणार आहेत. अधिक माहितीसाठी शेख हबीब यांच्याशी संपर्क साधवा. या मोफत प्रशिक्षण शिबिरात जास्तीत जास्त क्रिकेटपटूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे सचिव सचिन मुळे आणि सहसचिव शिरीष बोराळकर यांनी केले आहे.