औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शासनाला दिली १४ कोटींची तूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 12:43 AM2018-05-11T00:43:24+5:302018-05-11T00:44:17+5:30

यंदा खुल्या बाजारात तुरीचे भाव गडगडल्याने शासनाला हस्तक्षेप करीत ५४५० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव देऊन तूर खरेदी करावी लागत आहे. जिल्ह्यात मागील तीन महिन्यांत २८२५ शेतकºयांनी २४९६७.५० क्विंटल तूर शासनाला विकली. या तुरीची किंमत १३ कोटी ६० लाख रुपये एवढी आहे.

Aurangabad district has given 14 crores of toor to the government | औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शासनाला दिली १४ कोटींची तूर

औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शासनाला दिली १४ कोटींची तूर

googlenewsNext
ठळक मुद्दे१५ मेपर्यंत खरेदीची मुदत : पैठणमध्ये सर्वाधिक तूर खरेदी; हमी भावानंतरही बाजारात तुरीचे भाव पडलेलेच

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : यंदा खुल्या बाजारात तुरीचे भाव गडगडल्याने शासनाला हस्तक्षेप करीत ५४५० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव देऊन तूर खरेदी करावी लागत आहे. जिल्ह्यात मागील तीन महिन्यांत २८२५ शेतकºयांनी २४९६७.५० क्विंटल तूर शासनाला विकली. या तुरीची किंमत १३ कोटी ६० लाख रुपये एवढी आहे.
शासनाने यंदा तुरीचा हमीभाव ५४५० रुपये प्रतिक्विंटल ठेवले होते. फेब्रुवारी महिन्यात जाधववाडी येथील धान्याच्या अडत बाजारात ४२०० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल तूर विक्री झाली होती. कारण, उत्पादन चांगले असल्याने खुल्या बाजारात तुरीचे भाव गडगडले होते. अखेर नाफेड अंतर्गत मार्केटिंग फेडरेशनच्या नियंत्रणाखाली ३ फेब्रुवारी रोजी जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत तूर खरेदीला सुरुवात झाली. त्यानंतर जिल्ह्यात आणखी ४ तालुक्यांत खरेदी केंद्र सुरूकरण्यात आले. मागील वर्षी शेतकºयांच्या नावाखाली व्यापाºयांनी शासनाला मोठ्या प्रमाणात तूर विकल्याच्या घटना घडल्यामुळे यंदा खरेदीची पद्धत बदलण्यात आली होती. प्रथम शेतकºयांची आॅनलाईन नोंदणी करण्यात येत होती. त्यानुसार तुरीची खरेदी करण्यात येत आहे. १५ मेपर्यंत तूर खरेदीचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. जाधववाडीत शासकीय खरेदी केंद्रावर ३८९ शेतकºयांची ३१८३ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. पैठणमध्ये सर्वाधिक १३५७ शेतकºयांनी १४०४०.५० क्विंटल तूर शासनाला विकली. वैजापूर २९४ शेतकºयांनी १९१८.५० क्विंटल तूर, खुलताबादमध्ये ४०३ शेतकºयांनी २८१३.५० क्विंटल तूर शासनाला विकली. विशेष म्हणजे, ३४३० शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. मात्र, त्यातील २८२५ शेतकºयांनीच हमीभावात तूर विकली. हमीभावानुसार २४९६७.५० क्विंटल तूर १३ कोटी ६० लाख ७२ हजार ८७५ रुपयांची आहे. उल्लेखनीय म्हणजे शासकीय खरेदी सुरू झाल्यानंतर अडत बाजारात तुरीचे भाव वाढतील, असा अंदाज होता पण तो फोल ठरला. त्यानंतर तुरीचे भाव आणखी घसरले.
आजघडीला खुल्या बाजारात ३७०० ते ३८०० रुपये प्रतिक्विंटलने तूर खरेदी केली जात आहे. ज्यांनी शासकीय खरेदी केंद्रावर तूर विक्री केली त्यातील १५ टक्के लोकांच्या बँक खात्यात अजूनही रक्कम जमा झाली नाही. मागील वर्षी भरघोस उत्पादनामुळे शासनाने खरेदी केंद्रावर ८१ हजार क्विंटल तूर खरेदी केली होती.
१ कोटी ५५ लाखांचा हरभरा
सरकारने तुरीपाठोपाठ हरभराची खरेदी करण्यास सुरुवात केली. हरभराला ४४०० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव देण्यात आला. ५ तालुक्यांतील शासकीय खरेदी केंद्रांवर ५२८ शेतकºयांनीच ५८१२.५० क्विंटल हरभरा विक्री केला. १ कोटी ५५ लाख ७७ हजार रुपयांचा हा हरभरा सध्या शासकीय खरेदी केंद्रात ठेवण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी सी. डी. खांडे यांनी दिली.

Web Title: Aurangabad district has given 14 crores of toor to the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.