औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक मतदान; ६७ हजार पदवीधरांनी बजावले कर्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 12:57 PM2020-12-02T12:57:17+5:302020-12-02T12:58:58+5:30
६३.०५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
औरंगाबाद: मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडनणुकीत मंगळवारी भरभरुन मतदान झाले. मतदानासाठी मोठ्या रांगा लागल्याचे चित्र जवळपास सर्वच मतदान केंद्रावर दिसले. सर्वाधिक मतदान औरंगाबाद जिल्ह्यात झाले आहे. जिल्ह्यात १ लाख ६ हजार ३७९ मतदारांपैकी ६७ हजार ७४ पदवीधरांनी म्हणजे ६३.०५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ५ पैकी २ तृतीयपंथीय मतदारांनी मतदान केले. ग्रामीण भागातील ७० टक्के मतदानाचा अंदाज आहे.
सायंकाळी ४ वाजेपर्यंत ५३ टक्के मतदान झाले. शेवटच्या तासात मतदानाचा जोर वाढला. सकाळच्या सत्रात ९.२७ टक्केच मतदान झाले. दुपारच्या सत्रात २०.४८ टक्के मतदान झाले. दुपारी १२ ते २ यावेळेत ३६.९१ टक्के मतदान झाले. २ ते ४ वाजेपर्यंंत ५१.९८ टक्के मतदानाची नोंद झाली. ४ ते ५ या तासात ६३ टक्क्यांपर्यंत मतदान पोहोचले. या ३१ हजार ४१५ महिला मतदारांपैकी १६ हजार ९०७ महिला पदवीधरांनी मतदान केले. अंतीम तासात १२ टक्के मतदान झाले.