औरंगाबाद जिल्ह्यात २० टक्के पावसाची तूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 11:59 AM2019-09-25T11:59:08+5:302019-09-25T12:05:08+5:30

जायकवाडी धरण भरल्याचे  समाधान

Aurangabad district receives 20 percent less rainfall | औरंगाबाद जिल्ह्यात २० टक्के पावसाची तूट

औरंगाबाद जिल्ह्यात २० टक्के पावसाची तूट

googlenewsNext
ठळक मुद्दे५ तालुक्यांत कमी पाऊस सरासरी गाठण्यासाठी १३१.४३ मि.मी. पावसाची अपेक्षा 

औरंगाबाद : जिल्ह्यात २४ सप्टेंबर अखेरपर्यंत ८०.५४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५४४.०३ मि.मी. पाऊस झाला असून, २० टक्के पाऊस झाल्यास जिल्ह्याची सरासरी यंदा पूर्ण होणार आहे. सध्या सुरू असलेला पाऊस हा परतीचा पाऊस असल्याचे हवामानतज्ज्ञ सांगत आहेत. जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान सरासरी ६७५.४६ मि.मी. इतकी आहे. १३१.४३ मि.मी. पावसाची सध्या तूट आहे. 

- सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यांत १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. सिल्लोडमध्ये १०६.३३ टक्के, सोयगावमध्ये १०५.०९ टक्के पावसाची २४ सप्टेंबरपर्यंत झाली आहे. 
- वैजापूरमध्ये ९६.७९ टक्के, तर फुलंब्रीमध्ये ८९.११ टक्के पाऊस  झाला आहे. १०० टक्के पावसाची सरासरी पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर हे दोन तालुके आहेत. 
- औरंगाबाद तालुक्यात ६७.८४ टक्के, पैठण तालुका ६४.३७ टक्के, कन्नड तालुक्यात ८१.१५ टक्के, गंगापूर तालुक्यात ६७.०२ टक्के, खुलताबादमध्ये ५२.३३ टक्के पाऊस आजवर झाला आहे. 
- खुलताबाद आणि गंगापूर तालुक्यात कमी पाऊस झालेला आहे. पैठण तालुक्यात देखील दमदार पावसाची अपेक्षा आहे. 
- जायकवाडी धरण भरले असले तरी पैठण तालुक्यात ६४.३७ टक्केच पाऊस तालुक्यात झालेला आहे. सिल्लोड व सोयगावमध्ये ८ टक्के अधिक पाऊस झाला आहे. 

जिल्ह्यात २४ सप्टेंबरपर्यंत ५९२.०८ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित होते. आजवर ५४४.०३ मि.मी. पाऊस झाला आहे.४८.२३ मि.मी. पावसाची तूट सध्या आहे. मागील वर्षी आजवर ४४९ मि.मी. पाऊस झाला होता. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा बºयापैकी पाऊस झाल्याचे दिसते.

जायकवाडी धरण भरल्याचे  समाधान
जायकवाडी हे जिल्ह्यातील मोठे धरण आहे. ते यंदा नाशिकमध्ये झालेल्या पावसामुळे पूर्णक्षमतेने भरले आहे. सोयगाव आणि सिल्लोड तालुक्यातील लघु व मध्यम प्रकल्पांना पुरेसे पाणी आले आहे. वैजापूरमधील प्रकल्पांत पाणी आहे. गंगापूरमधील पाटबंधारे प्रकल्पांना दमदार पावसाची अपेक्षा आहे. ९० लघु आणि १६ मध्यम प्रकल्प औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. यातील ५० टक्के प्रकल्पांना दमदार पावसाची अपेक्षा आहे.

तालुके     झालेला पाऊस
औरंगाबाद               ६७.८४ मि.मी.
फुलंब्री                  ८९.११ मि.मी. 
पैठण               ६४.३७ मि.मी. 
सिल्लोड             १०५.७० मि.मी. 
सोयगाव               १०६.०० मि.मी.
कन्नड                ८१.१५ मि.मी. 
वैजापूर                ९६.७९ मि.मी. 
गंगापूर               ६७.०२ मि.मी. 
खुलताबाद               ५२.३३ मि.मी.
एकूण             ५४४.०३ मि.मी.  

Web Title: Aurangabad district receives 20 percent less rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.