पावसाच्या सरासरीपासून औरंगाबाद जिल्हा अद्याप कोसो दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 12:17 AM2018-07-16T00:17:02+5:302018-07-16T00:17:26+5:30

दीड महिना उलटून अद्यापही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला नाही. पावसाच्या लहरीपणामुळे जिल्हा आतापर्यंतच्या अपेक्षित सरासरीपासून कोसो दूर आहे. १५ जुलैपर्यंत २१२.७१ मि.मी. पाऊस अपेक्षित होता. प्रत्यक्षात मात्र सरासरी ६८.७१ टक्के म्हणजे १४६.१५ मि.मी. पाऊस झाला.

Aurangabad district is still not far from the rainfall average | पावसाच्या सरासरीपासून औरंगाबाद जिल्हा अद्याप कोसो दूर

पावसाच्या सरासरीपासून औरंगाबाद जिल्हा अद्याप कोसो दूर

googlenewsNext
ठळक मुद्देचकवा : रविवारी दिवसभर पावसाची पाठ

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : दीड महिना उलटून अद्यापही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला नाही. पावसाच्या लहरीपणामुळे जिल्हा आतापर्यंतच्या अपेक्षित सरासरीपासून कोसो दूर आहे. १५ जुलैपर्यंत २१२.७१ मि.मी. पाऊस अपेक्षित होता. प्रत्यक्षात मात्र सरासरी ६८.७१ टक्के म्हणजे १४६.१५ मि.मी. पाऊस झाला. शहरात शनिवारी झालेल्या रिमझिम पावसाने आल्हाददायक वातावरण निर्माण झाले; परंतु रविवारी दिवसभर पावसाने पाठ फिरविली.
पावसाळा सुरूझाल्यापासून शनिवारी प्रथमच दिवसभर रिमझिम पावसाचा अनुभव शहरवासीयांना घेता आला. शनिवारी जिल्ह्यात ७.७२ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली. यामध्ये औरंगाबाद तालुक्यात सर्वाधिक १६.९० मि.मी. पाऊस झाला, तर फुलंब्रीत ७, पैठणमध्ये ४, सिल्लोडमध्ये ८.८८, सोयगावमध्ये १३.६७, कन्नडमध्ये ३.१३, वैजापुरात ०.५०, गंगापूर येथे ६.४४ आणि खुलताबाद तालुक्यात ९ मि.मी. पावसाची नोंद झाली. शहर आणि परिसरात रिमझिम पाऊस आणि हवेतील गारवा, अशा आल्हाददायक वातावरणाचा शनिवारी शहरवासीयांनी आनंद घेतला. रविवारच्या सुटीनिमित्त पावसाचा आनंद घेण्याचे अनेकांनी नियोजन केले; परंतु पावसाची प्रतीक्षाच करण्याची वेळ त्यांच्यावर आली. तरीही सुटीचा योग साधत अनेकांनी निसर्गरम्य अशा पर्यटनस्थळी भेट देण्यावर भर दिला.
पावसाळा सुरूझाल्यापासून संपूर्ण जिल्ह्यात एकट्या औरंगाबाद तालुक्यात आतापर्यंत अपेक्षित २१५.९० मि.मी. च्या तुलनेत २२५.९५ मि.मी. म्हणजे १०४.९० टक्के पाऊस झाला आहे. ही टक्केवारी ५ जुलै रोजीच्या जोरदार पावसामुळे गाठल्या गेली. गेल्या दीड महिन्यापासून आतापर्यंत फुलंब्री तालुक्यात ८६.६०, पैठण तालुक्यात ५४.३५, सिल्लोड तालुक्यात ६४.८३, सोयगाव तालुक्यात ७५.१५, कन्नड ५८.९३, वैजापूर ७१.५९, गंगापूर ५७.१७, तर खुलताबाद तालुक्यात ४६.०६ टक्के पाऊस झाला आहे.

Web Title: Aurangabad district is still not far from the rainfall average

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.