राज्य जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी औरंगाबाद जिल्ह्याचा संघ रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:49 AM2018-02-24T00:49:33+5:302018-02-24T00:49:47+5:30
डोंबिवली येथे २४ व २५ फेब्रुवारीदरम्यान होणाºया राज्यस्तरीय टम्बलिंग व ट्रम्पोलिन जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी औरंगाबाद जिल्ह्याचा संघ रवाना झाला. रवाना झालेला संघ (१४ वर्षांखालील मुले)- आयुष मुळे, भव्यराज देवडा, अमरजित देवकर, हर्षित तांदळे, क्षितिज शिरसाठ, स्वरूप नाकील, अन्वय वावरे, यश हर्सूलकर.
औरंगाबाद : डोंबिवली येथे २४ व २५ फेब्रुवारीदरम्यान होणाºया राज्यस्तरीय टम्बलिंग व ट्रम्पोलिन जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी औरंगाबाद जिल्ह्याचा संघ रवाना झाला. रवाना झालेला संघ (१४ वर्षांखालील मुले)- आयुष मुळे, भव्यराज देवडा, अमरजित देवकर, हर्षित तांदळे, क्षितिज शिरसाठ, स्वरूप नाकील, अन्वय वावरे, यश हर्सूलकर.
मुली : नंदिनी जोसाळकर, स्वामिनी कुलकर्णी, युथिका जाधव, समिहा नन्नावरे, स्वराली पत्की, तेजस्वी उर्हेकर. १७ वर्षांखालील मुले : अजय पहूरकर, सचिन कसारे. संघासोबत प्रशिक्षक राहुल तांदळे, तर व्यवस्थापक म्हणून शैलेश पत्की हे गेले आहेत. आंतराष्ट्रीय पंच रणजित पवार हे स्पर्धा समन्वयक म्हणून असणार आहेत.
रवाना झालेल्या संघास मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ पातूरकर, सचिव हेमंत पातूरकर, औरंगाबाद जिल्हा जिम्नास्टिक्स संघटनेचे अध्यक्ष संकर्षण जोशी, आंतरराष्ट्रीय पंच व राज्य संघटनेचे सचिव मकरंद जोशी, साईचे उपसंचलक वीरेंद्र भांडारकर, प्रशिक्षक अजितसिंग राठोड, रामकृष्ण लोखंडे, जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे, तनुजा गाढवे आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.