औरंगाबाद जिल्ह्यात कपाशीचे क्षेत्र ६० हजार हेक्टरने घटणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 12:06 AM2018-04-28T00:06:31+5:302018-04-28T00:07:54+5:30

कापूस हे जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. मात्र, मागील हंगामात बोंडअळीचा प्रादुर्भाव लक्षात घेता शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. यामुळे शेतकरी यंदा कपाशीऐवजी मका किंवा अन्य कडधान्यांकडे वळण्याची शक्यता आहे. परिणामी, ४ लाख ३७ हजार हेक्टर कपाशीच्या सरासरी क्षेत्रापैकी ६० हजार हेक्टर क्षेत्र कमी होऊ शकते.

Aurangabad district will reduce the area of ​​cottonseed 60 thousand hectare! | औरंगाबाद जिल्ह्यात कपाशीचे क्षेत्र ६० हजार हेक्टरने घटणार!

औरंगाबाद जिल्ह्यात कपाशीचे क्षेत्र ६० हजार हेक्टरने घटणार!

googlenewsNext
ठळक मुद्देकृषी विभागाचा अहवाल : जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : कापूस हे जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. मात्र, मागील हंगामात बोंडअळीचा प्रादुर्भाव लक्षात घेता शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. यामुळे शेतकरी यंदा कपाशीऐवजी मका किंवा अन्य कडधान्यांकडे वळण्याची शक्यता आहे. परिणामी, ४ लाख ३७ हजार हेक्टर कपाशीच्या सरासरी क्षेत्रापैकी ६० हजार हेक्टर क्षेत्र कमी होऊ शकते. त्यादृष्टीने कृषी विभागाने ३ लाख ७७ हजार हेक्टरवरच कपाशीचे क्षेत्र प्रस्तावित केले आहे.
उल्लेखनीय म्हणजे, पैठण, गंगापूर, कन्नड व वैजापूर तालुक्यांतील काही भागात कापसाऐवजी यंदा उसाची लागवड होत असल्याचे विभागाच्या निदर्शनात आले आहे. शुक्रवारी वाल्मी येथे पालकमंत्री डॉ. प्रदीप सावंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक घेण्यात आली. त्यात जिल्हा कृषी अधीक्षक संजीव पडवळ यांनी खरीप हंगामपूर्व आढावा सादर केला. त्यांनी सांगितले की, जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख ३ हेक्टर आहे. मागील वर्षी यापैकी ६ लाख ९१ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा २०१८-२०१९ या खरीप हंगामात ७ लाख २० हजार हेक्टर (१०० टक्के) पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. मकाचे क्षेत्र १ लाख ९७ हजार हेक्टर व बाजरी ३९ हजार हेक्टरवर पेरणी अपेक्षित आहे. तृणधान्य पिकांचे २ लाख ३९ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले असून, या पिकांपासून ७ लाख ७५ हजार ७२९ मेट्रिक टन इतके उत्पादन होण्याचा अंदाज पडवळ यांनी व्यक्त केला. जि.प. कृषी अधिकारी आनंद गंजेवार यांनी सांगितले की, शेंदरी बोंडअळीचे व्यवस्थापन करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात १ मे रोजी ग्रामसभा तर २ मे रोजी तालुकास्तरावर किसान कल्याण दिवस आयोजित करण्यात आला आहे. याद्वारे संपूर्ण खरीप हंगामात शेंदरी बोंडअळी व्यवस्थापनासाठी व्यापक स्वरूपात अभियान राबविण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. या बैठकीत खा. चंद्रकांत खैरे, आ. अब्दुल सत्तार, आ. संदीपान भुमरे, महापौैर नंदकुमार घोडेले, जि.प.अध्यक्षा देवयानी डोणगावकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यासह अधिकारी, शेतकरी हजर होते.
सव्वा तासात बैठक आटोपली
जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक वाल्मी येथे दुपारी दीड वाजता सुरू झाली व पावणेतीन वाजता संपली. या बैठकीत खासदार व आमदारच बोलले त्यांनीच प्रश्न मांडले. यावेळी आपले प्रश्न घेऊन अनेक शेतकरी आले होते; पण त्यांना बोलू दिले नाही. पालकमंत्र्यांना जाण्याची घाई असल्याने बैठक सव्वा तासात आटोपती घेण्यात आली.
शेतकºयांच्या कर्जमाफीदारांची मराठी यादी देण्याचे आदेश
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने२२ंतर्गत १ लाख ७१ हजार ७२० शेतकºयांच्या कर्जमाफीची ६८९ कोटी ७४ लाख रुपयांची रक्कम प्राप्त झाली. त्यातील १ लाख ४८ हजार १७० शेतकºयांच्या खात्यावर ४६८ कोटी १६ लाख रुपये वर्ग करण्यात आले. आता २४५५० शेतकºयांच्या खात्यावर २२१ कोटी ५७ लाख रक्कम वर्ग करणे शिल्लक असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. या आकडेवारीवर सर्वप्रथम जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर आ. अब्दुल सत्तार यांनी संपूर्ण यादी इंग्रजीमध्ये आहे अनेक शेतकºयांना कळत नाही. त्यासाठी तालुकानिहाय कर्ज माफ झालेल्या शेतकºयांची यादी, किती कर्ज माफ झाले त्याची आकडेवारी मराठीतून देण्यात यावी, अशी मागणी केली. यावर सर्व आमदारांना त्यांच्या तालुक्यातील कर्जमाफीदारांची यादी मराठीतून देण्याचे आदेश डॉ. सावंत यांनी दिले.

Web Title: Aurangabad district will reduce the area of ​​cottonseed 60 thousand hectare!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.