औरंगाबादेत अ.भा. फुटबॉल स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 12:26 AM2019-03-15T00:26:42+5:302019-03-15T00:26:53+5:30
यंग स्टार क्लब व पटेल फुटबॉल अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने २३ मार्च ते १३ एप्रिलदरम्यान औरंगाबाद येथे खुली अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत देशभरातील नामांकित १६ क्लब आणि जिल्ह्यातील २६ संघ सहभागी होणार असल्याचे स्पर्धेचे आयोजक असीफ पटेल यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
औरंगाबाद : यंग स्टार क्लब व पटेल फुटबॉल अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने २३ मार्च ते १३ एप्रिलदरम्यान औरंगाबाद येथे खुली अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत देशभरातील नामांकित १६ क्लब आणि जिल्ह्यातील २६ संघ सहभागी होणार असल्याचे स्पर्धेचे आयोजक असीफ पटेल यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
हजरत सय्यद शाहनूरमियाँ हमवी रेहमतुल्ला आले यांच्या ३४१ व्या उरुसानिमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमुळे स्थानिक संघांना देशातील तुल्यबळ संघांशी खेळण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेत हैदराबाद, दिल्ली, केरळ, कोलकाता, मुंबई, नागपूर, भोपाळ, नगर या शहरांसह मराठवाड्यातील यजमान औरंगाबादसह जालना, बीड, नांदेड, परभणी शहरातील संघही सहभागी होणार आहेत. विजेतेपद पटकावणाऱ्या संघास ४१ हजार ३४१ आणि उपविजेत्यास २१ हजार ३४१ रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाणार आहे. ही स्पर्धा पटेल मैदानावर होत असून, तेथे २५ हजार पे्रक्षकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हे सामने सायंकाळी ६.३० ते रात्री १०.०० वाजेदरम्यान प्रकाशझोतात खेळविण्यात येणार आहेत, असे आसीफ खान यांनी सांगितले. सूत्रसंचालन अफरोज खान यांनी केले. यावेळी आसीफ खान यांच्यासह अस्लम खान, कैसर पटेल आदींची उपस्थिती होती.