औरंगाबादमध्ये लसूण, अद्रकाचे भाव गडगडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 12:09 PM2018-11-26T12:09:46+5:302018-11-26T12:11:05+5:30

भाजीपाला : लसूण, अद्रकचे भाव गडगडले, तसेच पालेभाज्याही मातीमोल भावात विकल्या जात होत्या. 

In Aurangabad, garlic and ginger prices collapsed | औरंगाबादमध्ये लसूण, अद्रकाचे भाव गडगडले

औरंगाबादमध्ये लसूण, अद्रकाचे भाव गडगडले

googlenewsNext

 

औरंगाबाद येथील फळभाजीपाला अडत बाजारात मागील आठवडा मंदीचा राहिला. लसूण, अद्रकचे भाव गडगडले, तसेच पालेभाज्याही मातीमोल भावात विकल्या जात होत्या. 

दुष्काळी परिस्थितीतही बाजारपेठेत फळभाजीपाल्यांची आवक जास्त झाल्याने भाव गडगडले आहेत. मध्यप्रदेशातून दररोज ३० ते ४० टन लसणाची आवक होत आहे. यामुळे भाव घटून २०० ते १,२०० रुपयांदरम्यान प्रतिक्विंटल विक्री करण्यात येत आहे. शिल्लक राहिलेला लसणाची पोतीच्या पोती अडत्यांच्या दुकानात व बाहेर पडून आहेत.

अद्रकाची आवक वाढल्याने भाव क्विंटलमागे १ हजार रुपयांनी घसरून २,५०० ते ५,२०० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाली. कांदा  १०० ते ६०० रुपये क्विंटलने विकला जात असूनही ३० ते ४० टक्के कांदा विक्रीविना शिल्लक राहत आहे. पालेभाज्यांमध्ये पालकाची गड्डी १ रुपया, तर मेथी  १० रुपयांत ४ गड्डी विकल्या जात आहेत.

Web Title: In Aurangabad, garlic and ginger prices collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.