औरंगाबादमध्ये पोक्सोंतर्गत वर्षभरात होते ११५ केसेसची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 04:39 PM2018-12-12T16:39:41+5:302018-12-12T16:41:20+5:30
दरवर्षी ४६ टक्के घटनांमधील गुन्हे सिद्ध झाले आहेत असेही ते म्हणाले.
औरंगाबाद : शहरात पोक्सो कायद्यांतर्गत वर्षभरात ११२ ते ११५ केसेस नोंदविल्या जातात. त्यात १/३ केसेस या बलात्काराच्या असतात, तर २/३ केसेस या विनयभंगाच्या असतात अशी माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने ‘पोक्सो’ कायद्यावरील एक दिवस परिषदेत ते बोलत होते. रामा इंटरनॅशनल येथे मंगळवारी सकाळी कार्यशाळेला सुरुवात झाली. यावेळी शहरातील पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यांबद्दल पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी माहिती दिली. ते म्हणाले, शहरात पोक्सो कायद्यांतर्गत वर्षभरात ११२ ते ११५ केसेस नोंदविल्या जातात. त्यात १/३ केसेस या बलात्काराच्या असतात, तर २/३ केसेस या विनयभंगाच्या असतात. यासोबतच पोक्सोसारखा प्रगत कायदा व पोलीस, वकिलांच्या वतीने न्यायालयासमोर मांडले जाणारे प्रबळ पुरावे यामुळे दरवर्षी ४६ टक्के घटनांमधील गुन्हे सिद्ध झाले आहेत असेही ते म्हणाले.
...तर गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण होईल
कायद्याची अंमलबजावणी करताना पोलीस विभाग, महिला आयोग, बाल आयोग, सामाजिक संस्था यांनी एकत्रित येऊन काम केले, तर राज्यात पोक्सोअंतर्गत गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण ८० टक्क्यांपर्यंत पोहोचेल व गुन्हेगारांमध्ये मोठा धाक निर्माण होईल.