औरंगाबादेत ६,८०० कोटींचा रशियन स्टील प्रकल्प येणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 11:36 AM2019-07-25T11:36:12+5:302019-07-25T11:38:08+5:30

पहिल्या टप्प्यात ८०० कोटी 

Aurangabad to have 6,800 crore Russian steel project ! | औरंगाबादेत ६,८०० कोटींचा रशियन स्टील प्रकल्प येणार!

औरंगाबादेत ६,८०० कोटींचा रशियन स्टील प्रकल्प येणार!

googlenewsNext
ठळक मुद्देऑरिकमध्ये (औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटी) प्रकल्प होणारदुसऱ्या टप्प्यात ६ हजार कोटींची गुंतवणूक

औरंगाबाद : रशियामधील सर्वात मोठी स्टील कंपनी नोव्होलिपटेस्क स्टील (एनएलएमके) औरंगाबादमध्ये पहिल्या टप्प्यात ८०० कोटी रुपयांची, तर दुसऱ्या टप्प्यात सहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या कंपनीच्या वरिष्ठ संचालकांनी बुधवारी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची मंत्रालयात भेट घेऊन चर्चा केली. यावेळी रशियाचे वाणिज्यदूत ए. शावार्लेव्ह उपस्थित होते.
इलेक्ट्रिक स्टील निर्मितीसाठी एनएलएमके कंपनीची जगभर ओळख असून, ही कंपनी महाराष्ट्रात प्रथमच आपला प्रकल्प सुरू करणार आहे. औरंगाबादच्या डीएमआयसीमध्ये (दिल्ली- मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर) शेंद्रा किंवा बिडकीनमध्ये या कंपनीने प्रकल्पासाठी जागा पाहिली असून, ती देण्याची तयारी शासनाने दर्शविली आहे. 

औरंगाबादच्या ऑरिकमध्ये (औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटी) हा प्रकल्प होणार असून, प्रकल्प सुरू करण्यासाठी मागील दोन वर्षांपासून कंपनीचे प्रतिनिधी प्रयत्नशील आहेत. कंपनीच्या प्रतिनिधींनी तीन वेळा वरील जागेची पाहणी केली आहे. सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर लवकरच कंपनीच्या कामाला सुरुवात होणार आहे. शासनाच्या विभागांकडून कंपनीच्या नियोजित प्रकल्पास सोयी-सुविधा मिळाव्यात, अशी मागणी कंपनीच्या शिष्टमंडळाने देसाई यांच्याकडे केली. दरम्यान, या कंपनीमुळे महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक होण्यास मदत होणार असून, अनेकांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे या कंपनीला शासन स्तरावर सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही देसाई यांनी दिली. यावेळी डीएमआयसीचे संचालक गजानन पाटील, एनएलएमके कंपनीचे संचालक व्ही. शेव्हलेव्ह, ए. काव्होसीन, कार्यकारी संचालक एन. गुप्ता, प्रकल्प व्यवस्थापक पी. रिचॉकॉव्ह आदी उपस्थित होते.

देशांतर्गत स्टील उपलब्ध होणार
भारतात मागील तीस वर्षांत विजेची मागणी अत्यंत वेगाने वाढलेली आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक सबस्टेशनची गरज तीसपटींनी वाढलेली आहे. वीज वहन व ट्रान्स्फॉर्मरसाठी लागणारे विशेष दर्जाचे स्टील एनएलएमके कंपनी तयार करते. एनएलएमके सध्या भारताला २० टक्के ट्रान्स्फॉर्मर स्टील पुरवत आहे. ही कंपनी महाराष्ट्रात सुरू झाल्यास देशांतर्गत स्टील उपलब्ध होणार आहे, अशी माहिती यावेळी कंपनीच्या प्रतिनिधींनी सादरीकरणाद्वारे दिली.
 

Web Title: Aurangabad to have 6,800 crore Russian steel project !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.