शिर्डी संस्थानला ३२ कोटींचे ८४०० क्विंटल तूप खरेदी करण्यास खंडपीठाची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 01:05 PM2019-12-20T13:05:06+5:302019-12-20T13:08:46+5:30

मोफत प्रसाद आणि भोजनालयासाठी गाईच्या तुपाची आवश्यकता

Aurangabad high court allows Shirdi Sansthan to buy 8400 quintal ghee of 32 crore | शिर्डी संस्थानला ३२ कोटींचे ८४०० क्विंटल तूप खरेदी करण्यास खंडपीठाची परवानगी

शिर्डी संस्थानला ३२ कोटींचे ८४०० क्विंटल तूप खरेदी करण्यास खंडपीठाची परवानगी

googlenewsNext
ठळक मुद्देदरम्यान पुर्वीच्या पुरवठादाराच्या कंत्राटाची मुदत ३१ डिसेंबर २०१९ ला पूर्ण होणार आहे.

औरंगाबाद : शिर्डी संस्थानला २०२०-२१ सालासाठी ३१ कोटी ६३ लाख ८६ हजार रुपये किंमतीचे ८४०० क्विंटल गाईचे शुद्ध तूप ‘ई-निवीदेद्वारे’ खरेदी करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्न  वराळे आणि न्या. अनिल किलोर यांनी शुक्रवारी (दि.२०) परवानगी दिली.

दरम्यान पुर्वीच्या पुरवठादाराच्या कंत्राटाची मुदत ३१ डिसेंबर २०१९ ला पूर्ण होणार आहे. म्हणून पुढील वर्षासाठीच्या खरेदीची ‘ई-निवीदा’ प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पुर्वीच्याच पुरवठादाराकडून अथवा इतर पुरवठादाराकडून गाईचे तूप खरेदी करण्यासही खंडपीठाने परवानगी दिली.

शिर्डी संस्थानतर्फे भक्तांना मोफत बुंदीचा प्रसाद दिला जातो. तसेच लाडू बनविण्यासाठी आणि भोजनालयामार्फत माफक दरात अन्न वितरीत करण्यासाठी गाईच्या तुपाची आवश्यकता असते. यासाठी पुढील वर्षाकरीता (२०२०-२१) संस्थानला ८४०० क्विंटल तुपाची आवश्यकता आहे. त्याची किंमत ३१ कोटी ६३ लाख ८६ हजार रुपये होते. या खरेदीला आणि या खरेदीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पर्यायी खरेदीला परवानगी देण्याची विनंती संस्थानचे वकील नितीन भवर पाटील यांनी दिवाणी अर्जाद्वारे केली. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील मंजुषा देशपांडे यांनी तर मुळ याचिकाकर्त्यातर्फे  अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर, अ‍ॅड. अजिंक्य काळे आणि अ‍ॅड. उमाकांत औटे यांनी काम पाहिले.

Web Title: Aurangabad high court allows Shirdi Sansthan to buy 8400 quintal ghee of 32 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.