अवघ्या १३ दिवसांमध्ये औरंगाबाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:05 AM2021-03-25T04:05:02+5:302021-03-25T04:05:02+5:30

कोरोना सक्रिय रुग्णांची स्थिती : दोन महिन्यांपूर्वी होते केवळ १०२ सक्रिय रुग्ण संतोष हिरेमठ औरंगाबाद : औरंगाबाद शहर देशात ...

Aurangabad in just 13 days | अवघ्या १३ दिवसांमध्ये औरंगाबाद

अवघ्या १३ दिवसांमध्ये औरंगाबाद

googlenewsNext

कोरोना सक्रिय रुग्णांची स्थिती : दोन महिन्यांपूर्वी होते केवळ १०२ सक्रिय रुग्ण

संतोष हिरेमठ

औरंगाबाद : औरंगाबाद शहर देशात टाॅप टेन जिल्ह्यांत आहे; परंतु दुर्दैवाने कोरोनाच्या सक्रिय म्हणजे उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येत औरंगाबाद जिल्हा टाॅप टेनमध्ये आला आहे. ११ मार्च रोजी औरंगाबाद देशात दहाव्या स्थानी होता; परंतु अवघ्या १३ दिवसांत बुधवारी (दि. २४) जिल्हा सक्रिय रुग्णांत देशात ६ व्या क्रमांकावर आला.

राज्यात कोरोना महामारीने फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्यातही मार्च महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला. जवळपास तीन महिने कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात होती; परंतु फेब्रुवारीपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला. विशेषत: महाराष्ट्रात कोरोनाचे अधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे देशात टाॅप टेन ९ जिल्हे हे राज्यातीलच आहेत. त्यात औरंगाबाद ६ व्या क्रमांकावर आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रोज एक हजारावर कोरोना रुग्ण आढळत आहेत. या आतापर्यंत तीनवेळा रुग्णसंख्येने पंधराशेचाही आकडा पार केला. वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी खाटा अपुऱ्या पडण्याची परिस्थिती निर्माण झाली. परिणामी, आरोग्य यंत्रणेपुढे आव्हान उभे राहिले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती

दिनांक - एकूण रुग्णसंख्या - सक्रिय रुग्णसंख्या

१ जानेवारी- ४५, ७६२ - ४६८

१ फेब्रुवारी- ४७,०१३ - १०२

१ मार्च- ५०, ५९१ - २,१९२

११ मार्च- ५५,३४१ - ४,१३१

२३ मार्च- ७०,५५१ - १२,९४९

मेअखेरपर्यंत प्रादुर्भाव होणार कमी

इतर राज्यांमध्ये यापुढे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळत आहे. त्यामुळे ही परिस्थिती दिसते. परंतु आपल्याकडील कोरोनाचा प्रादुर्भाव मेअखेरपर्यंत कमी होईल. तेव्हा आपल्याकडे ही परिस्थिती राहणार नाही. लोकसंख्येच्या प्रमाणाचाही विचार करण्याची गरज आहे.

- डाॅ. स्वप्निल लाळे, आरोग्य उपसंचालक

Web Title: Aurangabad in just 13 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.