औरंगाबाद लोकसभा निवडणूक निकाल 2019: पहिल्या फेरीनंतर इम्तियाज जलील आघाडीवर...कोण जिंकणार औरंगाबाद ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 09:23 AM2019-05-23T09:23:43+5:302019-05-23T09:26:02+5:30
Aurangabad Lok Sabha Election Results 2019 : पहिल्या फेरीत वंचित बहुजन आघाडी एमआयएमचे जलील यांची आघाडी
शिवसेनेचा मागील काही वर्षांपासून अभेद्य गड मानल्या जाणाऱ्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, काँग्रेसचे सुभाष झांबड, वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील, शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे हर्षवर्धन जाधव यांच्यात अटीतटीची लढत होत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून औरंगाबादमध्ये पहिल्या फेरीनंतर इम्तियाज जलील यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना 18758मतं मिळाली असून हर्षवर्धन जाधव यांच्या पारड्यात 13968 मतं पडली आहेत. चंद्रकांत खैरे 11340 तर सुभाष झांबड 3665 अशी मत मिळाली आहेत. पहिल्या फेरीत एमआयएमचे इम्तियाज जलील 4790 मताने आघाडी घेतली आहे.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एकूण १८,८६,२९४ मतदार असून यंदाच्या निवडणुकीत ६३.२ टक्के मतदान झालंय.
गेल्या निवडणुकीत शिवसेनेने चौथ्यांदा चंद्रकांत खैरे यांनाच पसंती दिली. काँग्रेसने माजी आमदार नितीन पाटील यांना मैदानात उतरविले होत. खैरे यांनी पाटील यांचा १ लाख ६२ हजार मतांनी पराभव करत लोकसभेत प्रवेश केला होता.