औरंगाबाद लोकसभा निवडणूक निकाल 2019: जलील यांची आघाडी घटली; खैरेंची जोरदार मुसंडी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 04:21 PM2019-05-23T16:21:34+5:302019-05-23T16:23:39+5:30

Aurangabad Lok Sabha Election Results 2019

Aurangabad Lok Sabha Election 2019 live result & winner: Imtiyaz Jalil VS Chandrakant Khaire VS Jadhav Votes & Results  | औरंगाबाद लोकसभा निवडणूक निकाल 2019: जलील यांची आघाडी घटली; खैरेंची जोरदार मुसंडी  

औरंगाबाद लोकसभा निवडणूक निकाल 2019: जलील यांची आघाडी घटली; खैरेंची जोरदार मुसंडी  

googlenewsNext

औरंगाबाद : शिवसेनेचा मागील काही वर्षांपासून अभेद्य गड मानल्या जाणाऱ्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, काँग्रेसचे सुभाष झांबड, वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील, शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे हर्षवर्धन जाधव यांच्यात अटीतटीची लढत होत आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर सुरुवातीपासूनचा जलील आघाडीवर राहिले. मात्र, आता १७ व्या फेरीअखेर इम्तियाज जलील यांची आघाडी काही अंशी कमी झाली आहे. 

मतदारसंघः औरंगाबाद
फेरीः 17 वी फेरी

आघाडीवरील उमेदवाराचे नावः इम्तियाज जलील 
पक्षः एमआयएम- वंचित बहुजन आघाडी 
मतंः 274963

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः चंद्रकांत खैरे 
पक्षः शिवसेना 
मतंः 263111

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः हर्षवर्धन जाधव 
पक्षः शिव स्वराज्य बहुजन पक्ष 
मतंः  198739

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः सुभाष झांबड 
पक्षः कॉंग्रेस 
मतंः9721

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एकूण १८,८६,२९४ मतदार असून यंदाच्या निवडणुकीत ६३.२ टक्के मतदान झालंय.    

गेल्या निवडणुकीत शिवसेनेने चौथ्यांदा चंद्रकांत खैरे यांनाच पसंती दिली. काँग्रेसने माजी आमदार नितीन पाटील यांना मैदानात उतरविले होत. खैरे यांनी पाटील यांचा १ लाख ६२ हजार मतांनी पराभव करत लोकसभेत प्रवेश केला होता. 
 

Web Title: Aurangabad Lok Sabha Election 2019 live result & winner: Imtiyaz Jalil VS Chandrakant Khaire VS Jadhav Votes & Results 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.