औरंगाबाद लोकसभा निवडणूक निकाल 2019: जलील यांची आघाडी कायम; खैरेंची दुसऱ्या स्थानी मुसंडी तर जाधव तिसऱ्या स्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 01:16 PM2019-05-23T13:16:55+5:302019-05-23T13:19:30+5:30
Aurangabad Lok Sabha Election Results 2019 : खैरेंची जोरदार मुसंडी; दुसऱ्या स्थानी घेतली झेप
औरंगाबाद : शिवसेनेचा मागील काही वर्षांपासून अभेद्य गड मानल्या जाणाऱ्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, काँग्रेसचे सुभाष झांबड, वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील, शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे हर्षवर्धन जाधव यांच्यात अटीतटीची लढत होत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून औरंगाबादमध्ये तिसऱ्या फेरीनंतर इम्तियाज जलील यांनी आघाडी घेतली आहे.
मतदारसंघः औरंगाबाद
फेरीः नववी फेरी
आघाडीवरील उमेदवाराचे नावः इम्तियाज जलील
पक्षः एमआयएम- वंचित बहुजन आघाडी
मतंः 145062
पिछाडीवरील उमेदवाराचे नावः चंद्रकांत खैरे
पक्षः शिवसेना
मतंः 128096
पिछाडीवरील उमेदवाराचे नावः हर्षवर्धन जाधव
पक्षः शिव स्वराज्य बहुजन पक्ष
मतंः 118846
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एकूण १८,८६,२९४ मतदार असून यंदाच्या निवडणुकीत ६३.२ टक्के मतदान झालंय.
गेल्या निवडणुकीत शिवसेनेने चौथ्यांदा चंद्रकांत खैरे यांनाच पसंती दिली. काँग्रेसने माजी आमदार नितीन पाटील यांना मैदानात उतरविले होत. खैरे यांनी पाटील यांचा १ लाख ६२ हजार मतांनी पराभव करत लोकसभेत प्रवेश केला होता.