औरंगाबादेत लोकमत महाएक्स्पोला उदंड प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 12:30 AM2018-01-28T00:30:14+5:302018-01-28T00:30:19+5:30
मराठवाड्याच्या राजधानीत सर्व स्तरातील गृहेच्छुकांसाठी अवघ्या १० लाखांपासून ते दीड कोटीपर्यंतचे फ्लॅट, रो-हाऊस, बंगले, दुकानाची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध झाली आहे. एवढेच नव्हे तर ज्यांना सायकल, मोटारसायकल, स्कूटर, कार, व्यावसायिक वाहन खरेदी करावयाचे आहे, अशांनाही शहरभर फिरण्याची गरज नाही. ‘लोकमत महाएक्स्पो’ मध्ये सर्व काही एकाच छताखाली खरेदी करता येत आहे. यामुळे या महाएक्स्पोला उदंड प्रतिसाद मिळत आहे. ग्राहकांच्या ‘वेळ व पैशांची’ बचत यानिमित्ताने होत आहे. शिवाय मागील तीन दिवसांत अनेकांचे हक्काचे घर व वाहनाचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मराठवाड्याच्या राजधानीत सर्व स्तरातील गृहेच्छुकांसाठी अवघ्या १० लाखांपासून ते दीड कोटीपर्यंतचे फ्लॅट, रो-हाऊस, बंगले, दुकानाची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध झाली आहे. एवढेच नव्हे तर ज्यांना सायकल, मोटारसायकल, स्कूटर, कार, व्यावसायिक वाहन खरेदी करावयाचे आहे, अशांनाही शहरभर फिरण्याची गरज नाही. ‘लोकमत महाएक्स्पो’ मध्ये सर्व काही एकाच छताखाली खरेदी करता येत आहे. यामुळे या महाएक्स्पोला उदंड प्रतिसाद मिळत आहे. ग्राहकांच्या ‘वेळ व पैशांची’ बचत यानिमित्ताने होत आहे. शिवाय मागील तीन दिवसांत अनेकांचे हक्काचे घर व वाहनाचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
जालना रोडवरील सेंट फ्रान्सिस हायस्कूलच्या मैदानावर ‘लोकमत महाएक्स्पो’ भरविण्यात आले आहे. यात प्रॉपर्टी प्रदर्शन, वाहन प्रदर्शन, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल्स प्रदर्शन, फर्निचर प्रदर्शन, गृहसजावट व गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन, असे सर्व प्रदर्शन एकाच ‘महाएक्स्पो’मध्ये पाहण्यास मिळत आहे. प्रदर्शनात प्रवेश करताच संत ज्ञानेश्वर व गौतम बुद्ध, देवी सरस्वती यांच्या भव्य मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. अशा प्रसन्न वातावरणात प्रदर्शनाच्या डाव्या बाजूला प्रॉपर्टी एक्स्पो सर्वांचे स्वागत करीत आहे. शहरातील नामांकित बिल्डर्सचे शहराच्या चोहोबाजंूनी गृहप्रकल्प येथे बघावयास मिळत आहेत. एवढेच नव्हे तर प्रशिक्षित कर्मचारी या गृहप्रकल्पांची इत्थंभूत माहिती देत आहेत. यात १० लाखांपासून ते दीड कोटीपर्यंतच्या घराचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय प्रदर्शन काळात जे घराची नोंदणी करतील अशा गृहेच्छुकांसाठी विशेष सवलतीही बांधकाम व्यावसायिकांनी जाहीर केल्या आहेत. पुढील काळात घरांच्या किमती १० ते १५ टक्क्यांनी वाढणार आहेत. घर महाग होण्याआधीच ते खरेदी करणे हा दूरदृष्टीचा विचार ठरत आहे. असाच सकारात्मक विचार घेऊन गृहेच्छुक या महाएक्स्पोमध्ये येताना दिसत आहेत. शनिवारी प्रत्येक बिल्डर्सच्या स्टॉलवर अर्धा ते एक तास बसून सविस्तर माहिती जाणून घेताना शेकडो लोक दिसून आले.
याशिवाय प्रत्येक दुचाकी व चारचाकी वाहन उत्पादक कंपनीच्या डीलर्ससाठी येथे स्वतंत्र दालन आहे. १३ हजारांपासून ते १ लाख रुपयांपर्यंतच्या विदेशी सायकली सर्वांचे आकर्षण ठरत आहेत. तसेच ५ लाखांपासून ते १५ लाखांपर्यंतच्या कार, व्यावसायिक वाहनही येथे बघण्यास मिळत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानांनीयुक्त अशा कार सर्वांचे आकर्षण ठरत आहेत. व्यावसायिक वाहन खरेदीसाठीही येथे खरेदीदार रात्री १० वाजेपर्यंत माहिती घेताना दिसून आले. याशिवाय इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल्स प्रदर्शनासाठी स्वतंत्र डोम उभारण्यात आला आहे. येथे एलईडी टीव्हीपासून ते एलईडी बल्बपर्यंत सर्व उपलब्ध करून देण्यात आले आहे. आटाचक्की, तेल काढण्याची घरगुती मशीन, व्यायाम करण्याची सामग्री व सोलार पॅनलची माहिती जाणून घेऊन ग्राहक आवर्जून माहितीपत्रक घेत आहेत. गृहोपयोगी वस्तू, गृहोद्योग, बचत गटांची उत्पादने, खरेदीसाठी गर्दी वाढत आहे.
आज चौथा दिवस
मागील तीन दिवसांत लोकमत महाएक्स्पोला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. उद्या रविवार २८ जानेवारी रोजी महाएक्स्पोचा चौथा दिवस आहे. तर सोमवारी २९ रोजी अंतिम दिवस आहे. सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत महाएक्स्पो सर्वांसाठी खुले राहणार आहे. पार्किंगही विनामूल्य ठेवण्यात आली आहे.
या महाएक्स्पोत सहभागी होऊन सर्वांगीण खरेदीचा आनंद लुटावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.