उद्या रंगणार औरंगाबाद महामॅरेथॉनचा थरार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 06:34 PM2019-12-14T18:34:39+5:302019-12-14T18:44:17+5:30

या महामॅरेथॉनला ब्लेड रनर अलिगा प्रसन्न कुमार आणि रशियातील सर्वात उंचीवर असणारे माऊंट एल्ब्रूस शिखर सर करणारे पहिले दिव्यांग (ट्रिपल अ‍ॅम्प्युटी) गिर्यारोहक शेखर गौड यांची उपस्थिती हे प्रमुख आकर्षण असणार आहे.

The Aurangabad mahamarathon will take place tomorrow | उद्या रंगणार औरंगाबाद महामॅरेथॉनचा थरार 

उद्या रंगणार औरंगाबाद महामॅरेथॉनचा थरार 

googlenewsNext

औरंगाबाद : लोकमत समूहातर्फे आयोजित महामॅरेथॉनच्या थरारास गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुल येथे उद्या, रविवारी भल्या पहाटे प्रारंभ होणार आहे. या महामॅरेथॉनला ब्लेड रनर अलिगा प्रसन्न कुमार आणि रशियातील सर्वात उंचीवर असणारे माऊंट एल्ब्रूस शिखर सर करणारे पहिले दिव्यांग (ट्रिपल अ‍ॅम्प्युटी) गिर्यारोहक शेखर गौड यांची उपस्थिती हे प्रमुख आकर्षण असणार आहे.

ही महामॅरेथॉन ५ कि.मी. अंतराची ‘फन रन’ (वय वर्षे १२ पेक्षा अधिक व धावण्याचा छंद असणाऱ्यांसाठी), १० कि.मी.ची पॉवर रन (वय वर्षे १६ पेक्षा जास्त) आणि २१ कि.मी. (वय वर्षे १८ पेक्षा जास्त) असणार आहे. त्यात फॅमिली रन ३ कि.मी. अंतराची असणार आहे. ती सर्वांसाठी खुली असेल. त्याचप्रमाणे लष्करातील धावपटंूसाठी २१ कि.मी. हे अंतर असणार आहे. दरम्यान , शनिवारी लोकमत भवन येथे बिब कलेक्शन व महाएक्स्पोचे आयोजन केले आहे. १४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेदरम्यान होणाऱ्या बिब कलेक्शनमध्ये तज्ज्ञांचे मार्गदर्शन  धावपटूंना मिळणार आहे. त्यात बिब कलेक्शन एक्स्पो धावपटूंसाठी सकाळी १० वाजता खुला राहील. बिब कलेक्शन व एक्स्पो कार्यक्रमात महामॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्यांना रेसर किट दिले जाईल. त्यामुळे आपला ई-मेल, मिळालेला एसएमएस किंवा पावती, तसेच फोटो ओळखपत्र एक्स्पोला येताना घेऊन येणे आवश्यक आहे. किंवा जवळच्या व्यक्तीकडे मेल, एसएमएस किंवा पावती देऊन आपल्या प्रतिनिधीला पाठविल्यास त्यांनादेखील या वस्तू दिल्या जातील. त्यासाठी तुमची स्वाक्षरी केलेले अधिकृत ओळखपत्र किंवा नोंदणी ई-मेलची प्रत असणे आवश्यक आहे.

रनिंगचे होणार व्हिडिओ अ‍ॅनॅलिसिस
महाएक्स्पो बिब कलेक्शन कार्यक्रमादरम्यान खास धावपटूंसाठी ट्रेडमिलवर रनिंग करण्याची संधी असेल. रनिंग करताना धावपटूंचे चित्रीकरण करून त्याचे विश्लेषण अ‍ॅडव्हान्स फिजिओ हबचे फिजिओथेरेपिस्ट डॉ. प्रशांत पारधे करणार आहेत.

Web Title: The Aurangabad mahamarathon will take place tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.