लोकमत समूहातर्फे औरंगाबाद महामॅरेथॉनचा रविवारी शहरात थरार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 01:03 AM2017-12-16T01:03:12+5:302017-12-16T01:03:16+5:30

औरंगाबाद : १७ डिसेंबर हा ऐतिहासिक औरंगाबादवासीयांसाठी ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. या दिवशी सळसळता उत्साह असणा-या तब्बल साडेसात हजार ...

 Aurangabad Mahamrathan rages on Sunday in Lokmanya T ... | लोकमत समूहातर्फे औरंगाबाद महामॅरेथॉनचा रविवारी शहरात थरार...

लोकमत समूहातर्फे औरंगाबाद महामॅरेथॉनचा रविवारी शहरात थरार...

googlenewsNext

औरंगाबाद : १७ डिसेंबर हा ऐतिहासिक औरंगाबादवासीयांसाठी ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. या दिवशी सळसळता उत्साह असणा-या तब्बल साडेसात हजार धावपटूंच्या सहभागामुळे येथील रस्ते ओसंडून वाहताना दिसणार आहेत. निमित्त असणार आहे लोकमत समूहातर्फे रविवारी (१७ डिसेंबर) होणा-या औरंगाबाद महामॅरेथॉनचे. देशभरातीलच नव्हे तर परदेशातील धावपटूंचा सहभाग तसेच सर्व संरक्षक दले, पोलीस, होमगार्ड आणि विशेष दलातील धावपटूंसाठी विशेष दिले जाणारे बक्षीस हेदेखील यंदाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरणार आहे.
लोकमत समूहातर्फे गतवर्षी ११ डिसेंबर रोजी औरंगाबाद मॅरेथॉनचे प्रथमच आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉनमध्ये तब्बल ५ हजारांपेक्षा जास्त धावपटूंनी सहभाग नोंदवला होता. या उदंड यशानंतर लोकमत समूहाने यंदा महाराष्ट्रात ४ शहरांत महामॅरेथॉनचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातील धावपटूंच्या उदंड प्रतिसादामुळे औरंगाबाद येथील महामॅरेथॉनमध्ये तब्बल साडेसात हजारांपेक्षा जास्त धावपटूंनी त्यांचा सहभाग निश्चित केला आहे. गतवर्षीप्रमाणेच यंदा औरंगाबादमध्ये रंगणारी महामॅरेथॉन नागरिक आणि खेळाडूंसाठी एक संस्मरणीय अनुभवाचा ठेवा ठरणार आहे. सर्व शहर या मॅरेथॉननिमित्त एकत्रित यावे, आपापसात जिव्हाळा निर्माण व्हावा, मैत्री वृद्धिंगत व्हावी, शहरात एकोपा वाढावा हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून लोकमत समूहाने ही महामॅरेथॉन आयोजित केली आहे.
२१ कि.मी. अर्धमॅरेथॉन, तर १० कि.मी. ही पॉवर रन असणार आहे. त्याचप्रमाणे फॅमिली व ज्येष्ठ नागरिकांसाठी ३ कि .मी., फन रन गटासाठी ५ कि .मी. अंतर असणारी मॅरेथॉन असणार आहे.
महामॅरेथॉनचे आकर्षण
मनोरंजनाचे कार्यक्रम यंदाच्या महामॅरेथॉनमध्ये मस्ती, नृत्य संगीत अशा मनोरंजक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. त्यात जगातील पहिला मराठी रॉकबँड ‘मोक्ष’ हे महामॅरेथॉनमध्ये आपल्या कलेचे सादरीकरण करणार आहे. त्यासोबत ढोल, ताशा आणि रॉक बँड यांच्या संमिश्रण असणारी जुगलबंदी धावपटूंना धावण्यासाठी त्यांच्यात नवीन ऊर्जा निर्माण करणार आहे.
पार्किंग व्यवस्था
मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी येणाºया नागरिकांच्या वाहनांमुळे शहरातील वाहतुकीला त्रास होऊ नये म्हणून पार्किंगची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
दुचाकी वाहनांसाठी सिग्मा हॉस्पिटलजवळ सकाळी ५ वाजेपर्यंत पार्किंग राहील.
कारसाठी श्रीहरी पॅव्हेलियन आणि सूतगिरणी एमएसईबी मैदान येथे सकाळी ५ वाजेपर्यंत पार्किंगची व्यवस्था.
मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाºया प्रत्येकाने पार्किं गमध्येच वाहन उभे करून वाहतूक सुरळीत राहण्यासाठी मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
याशिवाय शाहनूरमियाँ दर्गाजवळच्या उड्डाणपुलालगत असणाºया जबिंदा लॉन्स येथेही पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
दिव्यांग रन सकाळी ८ वाजता
लोकमत महामॅरेथॉन स्पर्धेत १ किलोमीटरची दिव्यांग रन होणार आहे. या स्पर्धेची सुरुवात सकाळी ८ वाजता होईल. या स्पर्धेत सोसायटी फॉर रिसर्च अ‍ॅण्ड रिहॅबिलिटेशन आॅफ मेंटली रिटायर्डेड संस्थेचे ६० विद्यार्थी, शिक्षक सहभागी होणार असल्याचे संस्थेच्या शर्मिला गांधी यांनी सांगितले. यात ६ ते ५५ वर्षे वयोगटातील व्यक्तींचा सहभाग असणार आहे.
१७ डिसेंबर
रोजी गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुलावर सकाळी २१ कि.मी. महामॅरेथॉनला सकाळी ६ वाजता प्रारंभ होणार आहे.
१० कि.मी.अंतराची मॅरेथॉन ६.१५ वाजता सुरू होईल, तर ५ व ३ कि.मी. अंतराच्या मॅरेथॉनला अनुक्रमे सकाळी ७ व ७.१0 ला सुरुवात होईल.
हेल्थ चेकअप
बीब एक्स्पोच्या दरम्यान शनिवारी महामॅरेथॉनमध्ये सहभागी होणाºया स्पर्धकांची वैद्यकीय तपासणी होणार आहे. सिग्मा हॉस्पिटल आणि धूत हॉस्पिटलतर्फे ही तपासणी होणार आहे.
आज बीब एक्स्पो
औरंगाबाद महामॅरेथॉनमध्ये सहभागी होणाºया सर्व धावपटूंसाठी लोकमत हॉल, लोकमत भवन येथे १६ डिसेंबर रोजी सकाळी १0 ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बीब कलेक्शन एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व धावपटूंसाठी खुले असणार आहे.
प्रमुख पाहुणे
महापौर नंदकुमार घोडेले, पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे, पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह, पोलीस उपआयुक्त राहुल श्रीरामे, पोलीस उपआयुक्त दीपाली घाडगे, पुरातत्व विभागाचे उपअधीक्षक डॉ. शिवकांत बाजपेयी हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय मनोज काला, ललित झांबड, राजेश वरगंटवार,महेश लाभशेटवार (सर्व सॅफरॉन ग्रुप), नवीन बगडिया (प्राईड ग्रुप), नीलेश अग्रवाल (सारा ग्रुप), सचिन मलिक (फस्ट आयडिया एज्युकेशन), राहुल पगारिया (पगारिया आॅटो), डॉ. हिमांशू गुप्ता (धूत हॉस्पिटल), श्रीकांत पाटील (कुलझी अ‍ॅक्वा मिनरल वॉटर) यांचीदेखील प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
बीब एक्स्पोमध्ये नॉब रॉक बँड
न्यूट्रिशनवर चर्चा होणार आहे. तसेच नॉब रॉक बॅण्डचे सादरीकरण करून मॅरेथॉनमार्गाविषयी चर्चा होऊन फिजिओथेरपिस्टांशी संवादही साधता येईल. तसेच याच कार्यक्रमात सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान बीब (चेस्ट नंबर), गुडी बॅग व टी-शर्ट दिले जाणार आहेत. रेसर किट घेण्यासाठी सहभागी होणाºया धावपटूंनी ईमेल, एसएमएस, पावती आणि फोटो ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. सोबत एक प्रतिनिधीही येऊ शकतो. मात्र, सोबत अधिकृत पत्र, ओळखपत्र प्रत व नोंदणी ईमेलची प्रत असणे आवश्यक आहे.
शालेय विद्यार्थी धावपटूंना देणार प्रोत्साहन
लोकमत महामॅरेथॉनमध्ये सहभागी होणाºया हजारो धावपटूंचे विविध मार्गांवर जागोजागी शालेय विद्यार्थी स्वागत करणार आहेत. लेझीम पथक, बँडपथक, ढोल-ताशेपथक उत्साह वाढविणार आहेत, शिवाय या धावपटूंवर पुष्पवृष्टीही करण्यात येणार आहे.
लोकमत महामॅरेथॉनची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. रविवार, १७ रोजी गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुल येथून महामॅरेथॉनला पहाटे सुरुवात होणार आहे. महामॅरेथॉन मार्गावर शहरातील विविध ठिकाणी विविध शाळांचे विद्यार्थी धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे स्वागत करणार आहेत.
शालेय विद्यार्थी लेझीम खेळणार आहेत, तसेच विद्यार्थ्यांचे बँडपथक व ढोल-ताशापथक दणदणाट करणार आहे. काही विद्यार्थी धावपटूंवर पुष्पवृष्टी करणार आहेत, असे जल्लोषपूर्ण व धावपटूंसाठी स्फुर्तिदायी वातावरण सर्वत्र राहणार आहे.
शहानूरमियाँदर्गा चौकात- पी.डी.जवळकर पब्लिक स्कूलचे विद्यार्थी धावपटूंचे स्वागत करणार आहेत, तसेच दूधडेअरी चौकात शंकरसिंग नाईक विद्यालय, महात्मा ज्योतिबा फुले चौकात (औरंगपुरा) शिशुविहार हायस्कूल, डिमार्ट कॉर्नर (हडको) सुपर थर्टी इंग्लिश स्कूल, टीव्ही सेंटर चौक येथे गोदावरी पब्लिक स्कूल, ग्रामीण पोलीस अधीक्षक बंगल्याजवळील चौकात वेणुताई चव्हाण कन्या विद्यालय, बळीराम पाटील चौकात बळीराम पाटील हायस्कूल, वोखार्ड चौकात जिजामाता कन्या विद्यालय, सिडको बसस्टँड चौकात तुळजाभवानी विद्यालय, राजर्षी शाहू विद्यालय, सेव्हन हिल येथे अलहुदा उर्दू हायस्कूल, तसेच गजानन महाराज मंदिर चौकात ज्ञानप्रकाश विद्यामंदिर, गारखेडा चौकात गजानन बहुउद्देशिय प्रशाला यासह अन्य शाळांतील विद्यार्थी असणार आहेत.

Web Title:  Aurangabad Mahamrathan rages on Sunday in Lokmanya T ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.