औरंगाबाद महामॅरेथॉनला ‘महाप्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 01:31 AM2017-12-18T01:31:47+5:302017-12-18T01:31:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : औरंगाबादकरांच्या अभूतपूर्व प्रतिसादाच्या जोरावर रविवारी (दि.१७) ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या दुसºया महामॅरेथॉन स्पर्धेलाही शहरवासीयांसोबत देश-विदेशातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : औरंगाबादकरांच्या अभूतपूर्व प्रतिसादाच्या जोरावर रविवारी (दि.१७) ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या दुसºया महामॅरेथॉन स्पर्धेलाही शहरवासीयांसोबत देश-विदेशातील धावपटूंचा ‘महाप्रतिसाद’ लाभला आणि ‘लोकमत समूहा’वर लोकांच्या असलेल्या निस्सीम प्रेमावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले. लोकमतच्या पुढाकाराने होत असलेल्या सॅफ्रॉन लॅण्डमार्क प्रस्तुत औरंगाबाद महामॅरेथॉनमध्ये २१ देशांतील आणि विविध राज्यांतील ३0 हून अधिक शहरांतील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबतच आबालवृद्धांनी सहभाग घेऊन ‘हम भी किसे सें कम नहीं’ हे दाखूवन दिले.
‘शहर धावले माझ्यासाठी आणि मी धावलो शहरासाठी’ या जनभावनेचा ‘याचि देही, याचि डोळा’ अनुभव या महामॅरेथॉनमध्ये पाहायला मिळाला. वर्षभरापासून प्रतीक्षा लागलेल्या उत्कंठावर्धक दुसºया पर्वामध्ये नागरिकांचा उत्साहदेखील द्विगुणित होता. खेळाडूंनी रविवारी पहाटे-पहाटेच गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुलावर जमण्यास सुरुवात केली. मॅरेथॉनमध्ये धावण्याची ऊर्मी एवढी की, पहाटेच्या थंडीचाही त्यांच्यावर काही परिणाम जाणवत नव्हता.
‘लोकमत’चे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा, ‘सखी मंच’च्या संस्थापक अध्यक्षा आशू दर्डा, महापौर नंदकुमार घोडेले, ब्रिगेडियर डी. के. पात्रा, विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, धर्मादाय सहआयुक्त श्रीकांत भोसले, उपायुक्त वर्षा ठाकूर, प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते, धर्मादाय सहआयुक्त श्रीकांत भोसले, नागरी संरक्षण विभागाचे पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, सहायक आयुक्त सी. डी. शेवगण, सहायक आयुक्त एस. एच. भापकर, पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे आणि ज्ञानेश्वर कांबळे, घाटीचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे उपअधीक्षक शिवाकांत बाजपेयी आदी मान्यवरांच्या (पान २ वर )
देश-विदेशातील धावपटू झाले सहभागी
लोकमत महामॅरेथॉनमध्ये देश-विदेशातील धावपटूंनी सहभाग नोंदवत बक्षिसांची लयलूट केली. केनियाची धावपटू ब्रिगीड किमितवार हिने विदेशी गटात प्रथम क्रमांक पटकावला, तर अमेरिकेच्या लॉरेन्सस नेक यांच्यासह इंग्लंड, चीन, केनिया, भूतान, मलेशिया आदी देशांतील खेळाडूंनीही मॅरेथॉनमध्ये आपले कौशल्य दाखवले. यासह देशातील भोपाळ, दिल्ली, हैदराबाद, जयपूर, अहमदाबाद आदी शहरांतील धावपटू मोठ्या संख्येने सहभागी झाले, तर राज्यातील मुंबई, नाशिक, नागपूर, सांगली, सातारा, अकोला, लातूर, परभणी, नांदेड, उदगीर, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, वर्धा, यवतमाळ, गडचिरोली आदी शहरांसह ग्रामीण भागातील धावपटू सहभागी झाले होते. महामॅरेथॉनमधील बहुतांश बक्षिसे ही राज्यातील विविध शहरांतून आलेल्या धावपटूंनीच पटकावली आहेत.
खुल्या गटात किशोर, प्राजक्ता ठरले अव्वल
पुरुषांच्या २१ कि. मी. खुल्या गटात किशोर जाधव याने वर्चस्व राखले. किशोरने २१ कि. मी.ची अर्धमॅरेथॉन १ तास १७ मिनिटे सहा सेकंदात जिंकली.
गतवर्षी लोकमत औरंगाबाद मॅरेथॉनमध्ये विजेतेपद पटकावणाºया गजानन ढोले याला या वेळेस मात्र दुसºया क्रमांकावर समाधान मानावे लागले. गजानन ढोले २१ कि. मी. अंतर १ तास १८ मिनिटे व ३६ सेकंदात पूर्ण केले. विठ्ठल आटोळे हा तिसºया स्थानी आला.
महिलांच्या खुल्या गटात नागपूरच्या प्राजक्ता गोडबोले हिने प्रारंभापासूनच आघाडी घेताना अव्वलस्थान मिळवले. तिने २१ कि. मी. अंतर १ तास २२ मिनिटे व ५५ सेकंदात पूर्ण केले. पूजा राठोडने दुसरा क्रमांक, तर भारती दुधे हिने तिसरे स्थान मिळवले.
२१ कि. मी. : किशोर जाधव, प्राजक्ता गोडबोले विजेते
पुरुष (खुला गट) : १. किशोर जाधव, २. गजानन ढोले, ३. विठ्ठल आटोळे.
४महिला (खुला गट) : १. प्राजक्ता गोडबोले, २. पूजा राठोड, ३. भारती दुधे.
४डिफेन्स गट (पुरुष) : १. भागेश पाटील.
४ज्येष्ठ गट (पुरुष) : १. कैलास माने, २. लक्ष्मण शिंदे, ३. राजेश साहू.
४महिला : १. शोभा देसाई, २. माधुरी निमजे, ३. शोभा पाटील.
४विदेशी गट (महिला) : १. ब्रिगिड किमितवाई.
१० कि.मी.चे विजेते :
४खुला गट (पुरुष) : १. रवी दास, २. एम. हरिया, ३. लालू हिरण्य.
४खुला गट (महिला) : १. पूजा श्रीडोळे, २. निकिता नागपुरे,
३. सोनाली पवार.
४ज्येष्ठ गट (पुरुष) : १. पांडुरंग पाटील, २. लक्ष्मण लव्हाटे,
३. भगवान कछवे.
४ज्येष्ठ गट (महिला) : १. मोनिका माहेश्वरी, २. सुनिती आंबेकर,
३. अनुराधा कछवे.
४दिव्यांग (पुरुष) : १. अजित होडेकर, २. नंदी सावंत, ३. संदीप राठोड.
४दिव्यांग (महिला) : १. वैष्णवी शिंदे, २. अमृता दीक्षित, ३. जान्हवी वैसनकर.
सांगलीचा भागेशच ठरला वेगवान धावपटू
डिफेन्स गटात खेळणारा मूळचा सांगलीचा भागेश पाटीलच खºया अर्थाने वेगवान धावपटू ठरला. त्याने २१ कि.मी. अंतर १ तास ८ मिनिटे आणि ३७ सेकंदांत पूर्ण करताना डिफेन्स गटात अव्वल स्थान पटकावले. २१ कि.मी. ज्येष्ठांच्या पुरुष गटात कैलास माने अव्वल स्थानी राहिला. त्याने १ तास ३२ मिनिटे व ४३ सेकंद वेळ नोंदवला. लक्ष्मण शिंदेने दुसरे स्थान मिळवले, तर राजेश साहूने तिसरा क्रमांक मिळवला. जेष्ठ महिलांच्या गटात शोभा देसाई अव्वल ठरल्या. त्यांनी १ तास ४६ मि. ७ सेकंदात २१ कि.मी. अंतर पूर्ण केले. माधुरी निमजे दुसºया तर शोभा पाटील तिसºया स्थानी राहिल्या.