औरंगाबाद महानुभाव आश्रम ते लिंक रोड ५ डिसेंबर रोजी होणार खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 12:44 AM2017-11-30T00:44:37+5:302017-11-30T00:44:41+5:30
महानुभाव आश्रम ते लिंक रोड या पैठण रोडवरील २ कि़ मी. च्या कामामुळे मे २०१७ पासून त्रस्त असलेल्या नागरिकांची ५ डिसेंबरपासून सुटका होणार आहे. तो २ कि़ मी. चा चौपदरी रस्ता वाहतुकीसाठी दोन्ही बाजूंनी खुला होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महानुभाव आश्रम ते लिंक रोड या पैठण रोडवरील २ कि़ मी. च्या कामामुळे मे २०१७ पासून त्रस्त असलेल्या नागरिकांची ५ डिसेंबरपासून सुटका होणार आहे. तो २ कि़ मी. चा चौपदरी रस्ता वाहतुकीसाठी दोन्ही बाजूंनी खुला होणार आहे. २६ कोटी रुपयांचा खर्च या रस्त्याच्या कामावर होणार असून, उच्च न्यायालयातील एका याचिकेमुळे हे काम बांधकाम विभागाने तातडीने केले आहे.
सहा महिन्यांपासून नागरिकांची शहराशी व औद्योगिक वसाहतीकडे जाणाºया उद्योजकांची, शाळेत जाणाºया विद्यार्थ्यांची ‘लिंक’ तुटली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या रस्त्याचे काम गतीने करावे, यासाठी नागरिकांनी आंदोलनेदेखील केली.
महानुभाव आश्रमामधील ड्रेनेज वाहिनी लिंक रोडच्या दुसºया बाजूचे काम सुरू असताना मलब्याखाली येऊन चोकअप झाली होती.
तर रस्त्याच्या कामासाठी केलेल्या खोदकामामुळे हजारो विद्यार्थी
आणि हजारो नागरिकांसाठी
करण्यात आलेला पर्यायी रस्ता पावसाळ्यात पूर्णत: चिखलमय झाला होता. त्या २ कि़ मी. च्या कामासाठी नागरिकांना प्रचंड त्रास झाला आहे. आता तो रस्ता खुला होणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
महानुभाव आश्रम ते लिंक रोड
५ डिसेंबर रोजी होणार खुला