औरंगाबाद महापालिका निवडणूक रणसंग्राम: विशिष्ट राजकारण्यांसाठी प्रभाग होणार नाहीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2021 07:30 PM2021-10-21T19:30:50+5:302021-10-21T19:44:03+5:30

Aurangabad Municipal Corporation Election: राज्य निवडणूक आयोगाने पालिकेला तीन सदस्यांचा प्रभाग तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिका कच्चा प्रारूप आराखडा तयार करून ठेवणार आहे.

Aurangabad Municipal Corporation Election Battle: There will be no wards for specific politicians! | औरंगाबाद महापालिका निवडणूक रणसंग्राम: विशिष्ट राजकारण्यांसाठी प्रभाग होणार नाहीत !

औरंगाबाद महापालिका निवडणूक रणसंग्राम: विशिष्ट राजकारण्यांसाठी प्रभाग होणार नाहीत !

googlenewsNext
ठळक मुद्देमनपा प्रशासकांची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा

औरंगाबाद : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महापालिकेला नवीन प्रभागरचना तयार करण्याची कवायत सुरू करावी लागणार आहे. त्याची रंगीत तालीम करण्यापूर्वी बुधवारी मनपा ( Aurangabad Municipal Corporation Election) प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत प्राथमिक चर्चा केली. प्रभाग तयार करताना २०११च्या जनगणनेनुसार तयार करण्यात आलेले प्रगणक गट (ईबी) जशास तसे ठेवण्यावर मनपा अधिकाऱ्यांचा कल राहील. विशिष्ट राजकीय मंडळींना डोळ्यासमोर ठेवून प्रभाग तयार केले जाणार नाहीत.

राज्य निवडणूक आयोगाने पालिकेला तीन सदस्यांचा प्रभाग तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिका कच्चा प्रारूप आराखडा तयार करून ठेवणार आहे. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी, कर्मचारी अंतिम आराखडा तयार करतील. औरंगाबाद महापालिकेच्या वॉर्डरचनेचा आणि आरक्षणाचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. ही याचिका निकाली निघाली तरच पुढील वाटचाल सोपी होणार आहे. त्यापूर्वी महापालिका आयोगाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करीत आहे. बुधवारी प्रभागरचनेचा कच्चा प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी मनपा प्रशासक यांच्या उपस्थितीत प्राथमिक चर्चा करण्यात आली. या बैठकीत कच्चा आराखडा तयार करण्यावर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. झोन कार्यालयात नियुक्त नगररचना विभागाचे अभियंते, इतर विभागाचे अभियंते, कर्मचारी यांच्यावर प्रभागनिहाय कच्चे नकाशे तयार करण्याची जबाबदारी असल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्रशासनाचा सावध पवित्रा
आता प्रभागरचना करताना तीन वॉर्डांची जुळवाजुळव करताना प्रगणक गट विचारात घ्यावे लागणार आहेत. प्रगणक गट फोडता येणार नाहीत किंवा जवळचे वॉर्ड सोडून इतर वॉर्डालाही गट जोडता येणार नाहीत. वॉर्डाच्या सीमारेषा तयार करताना प्रगणक गटाचा विचार करूनच नकाशाचे काम करावे लागणार आहे. झोन कार्यालयांतर्गत असलेले वॉर्ड एकत्र करून त्यांचे प्रभाग तयार केले जाणार आहेत. तीन वॉर्डांचा एक प्रभाग बनवला जाणार असल्यामुळे वॉर्डांच्या सीमा मोठ्या प्रमाणात बदलल्या जाण्याची शक्यता आहे. प्रगणक गटांची अदलाबदल करायची झाल्यास वॉर्ड आणि प्रभाग सोडून करता येणार नाही. त्यामुळे प्रत्येक प्रभागाची लोकसंख्या जवळपास सारखी राहण्याची शक्यता आहे.

प्रगणक गट म्हणजे काय?
महापालिकेची निवडणूक २०११ मध्ये झालेल्या जनगणनेच्या आधारावर होणार आहे. जनगणना करताना प्रत्येक वॉर्डात १ हजार नागरिकांचा एक ‘प्रगणक गट’ तयार करण्यात आला. प्रत्येक प्रगणक गटाला एक विशिष्ट क्रमांक देण्यात येतो. त्यानुसार त्या प्रगणक गटाची ओळख असते. वॉर्डातील लोकसंख्या ठरविताना हे प्रगणक गट उपयोगात आणले जातात.

सोयीच्या प्रभागासाठी इच्छुकांची कसरत; महापालिका कच्चा प्रारूप आराखडा तयार करणार

Web Title: Aurangabad Municipal Corporation Election Battle: There will be no wards for specific politicians!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.