औरंगाबाद महानगरपालिका : नंदकुमार घोडेले यांनी महापौरपदासाठी तर विजय औताडे यांनी उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज केला दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 06:05 PM2017-10-25T18:05:08+5:302017-10-25T18:16:38+5:30

महापौर, उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी सेना- भाजप युतीच्या उमेदवारांनी अर्ज भरले. यावेळी शिवसेनेतर्फे नंदकुमार घोडेले यांनी महापौर पदासाठी तर विजय औताडे यांनी उपमहापौर पदासाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

Aurangabad Municipal Corporation: Nandkumar Ghodele nominated for the post of Mayor and Vijay autade filed nomination for the post of Deputy Mayor. | औरंगाबाद महानगरपालिका : नंदकुमार घोडेले यांनी महापौरपदासाठी तर विजय औताडे यांनी उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज केला दाखल

औरंगाबाद महानगरपालिका : नंदकुमार घोडेले यांनी महापौरपदासाठी तर विजय औताडे यांनी उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज केला दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देशिवसेनेतर्फे नंदकुमार घोडेले यांनी महापौर पदासाठी तर विजय औताडे यांनी उपमहापौर पदासाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. युतीकडे पूर्णपणे बहुमत असल्याने निवडणूक अधिक सुकर होणार आहे. 

औरंगाबाद : महापौर, उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी सेना- भाजप युतीच्या उमेदवारांनी अर्ज भरले. यावेळी शिवसेनेतर्फे नंदकुमार घोडेले यांनी महापौर पदासाठी तर विजय औताडे यांनी उपमहापौर पदासाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.  यावेळी दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते उपस्थित होते. 

शिवसेनेतर्फे नंदकुमार घोडेले यांची महापौरपदाचा उमेदवार म्हणून आधीच निवड जाहीर झाली होती. परंतु; उपमहापौरपदासाठी भाजपच्या स्थानिक कोअर कमिटीमध्ये एकमत न झाल्याने उमेदवारी निश्चित करण्याचा चेंडू श्रेष्ठींकडे सोपविण्यात आला होता. अडीच वर्षांसाठी हे पद असल्याने अचानक इच्छुकांची संख्या पाचपेक्षा अधिक झाली होती. शेवटी आज सकाळी पक्ष श्रेष्टींनी विजय औताडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. 

रविवारी होणार मतदान 
महापौर, उपमहापौरपदासाठी रविवारी ( दि. २९ ) निवडणूक घेण्यात येणार आहे. युतीकडे पूर्णपणे बहुमत असल्याने निवडणूक अधिक सुकर होणार आहे. 

Web Title: Aurangabad Municipal Corporation: Nandkumar Ghodele nominated for the post of Mayor and Vijay autade filed nomination for the post of Deputy Mayor.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.