औरंगाबाद महानगरपालिकेने 395 मोबाईल टॉवरच्या परवानगीचे प्रस्ताव फेटाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 19:57 IST2018-11-26T19:54:26+5:302018-11-26T19:57:22+5:30
बेकायदा इमारतीवर कुठलेही नियम न पाळता हे टॉवर गेल्या अनेक वर्षांपासून उभे आहेत.

औरंगाबाद महानगरपालिकेने 395 मोबाईल टॉवरच्या परवानगीचे प्रस्ताव फेटाळले
औरंगाबाद : शहरातील 481 पैकी 395 मोबाईल टॉवरच्या परवानगीचे प्रस्ताव महापालिकेने फेटाळून लावले आहेत. बेकायदा इमारतीवर कुठलेही नियम न पाळता हे टॉवर गेल्या अनेक वर्षांपासून उभे आहेत. महापालिका आता टॉवर उभ्या असलेल्या इमारतीच्या सुविधा बंद करणार आहे.
शहरात विविध कंपन्यांचे 481 मोबाइल टॉवर आहेत. त्यातील बहुतांश टॉवर बेकायदा असुन कंपन्यांनी महापालिकेकडे परवानगीसाठी अर्ज केले. दरम्यान, महापालिकेने या प्रस्तावामध्ये असलेल्या त्रुटी पूर्ण करण्यासाठी कंपन्यांना नोटिसा दिल्या होत्या. वारंवार मुदत देऊनही कंपन्यांनी त्रुटींची पूर्तता करण्यात आली नाही. यामुळे आज महापालिकेने 395 टॉवरच्या परवानगीचे प्रस्ताव फेटाळून लावले. महापालिका आता हे टॉवर उभ्या असलेल्या इमारतीच्या सुविधा बंद करणार आहे.
18 कोटी थकले
मोबाईल टॉवरच्या करापोटी महापालिकेचे 18 कोटी रुपये थकीत आहेत. विशेष म्हणजे यात सरकारी कंपनी असलेल्या बीएसएनएलच्या टॉवरचा देखील समावेश आहे.