कचरा प्रक्रियेत औरंगाबाद मनपाचे ‘विघ्न’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 12:37 AM2018-09-10T00:37:24+5:302018-09-10T00:37:54+5:30
कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिका प्रशासनच ‘विघ्न’ निर्माण करीत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. चिकलठाणा, रमानगर, जकात नाका येथे कचºयावर प्रक्रिया करणारी मशिनरी मागील एक महिन्यापासून पडून आहे. महापालिका प्रशासनाला साधे शेड उभारता आलेले नाहीत. अधिकाºयांमधील बेबनाव, नियोजनाचा अभाव आदी कारणांमुळे कचरा प्रक्रिया केंद्र उभे राहण्यापूर्वीच वादाच्या भोवºयात अडकले आहेत. युद्धपातळीवर शेड उभारणी, मशिनरी बसविणे ही कामे प्रशासनाकडूनच कासवगतीने सुरू आहेत. येणाºया दोन महिन्यांपर्यंत एक किलो कचºयावरही प्रक्रिया होणे अशक्य आहे.
मुजीब देवणीकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिका प्रशासनच ‘विघ्न’ निर्माण करीत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. चिकलठाणा, रमानगर, जकात नाका येथे कचºयावर प्रक्रिया करणारी मशिनरी मागील एक महिन्यापासून पडून आहे. महापालिका प्रशासनाला साधे शेड उभारता आलेले नाहीत. अधिकाºयांमधील बेबनाव, नियोजनाचा अभाव आदी कारणांमुळे कचरा प्रक्रिया केंद्र उभे राहण्यापूर्वीच वादाच्या भोवºयात अडकले आहेत. युद्धपातळीवर शेड उभारणी, मशिनरी बसविणे ही कामे प्रशासनाकडूनच कासवगतीने सुरू आहेत. येणाºया दोन महिन्यांपर्यंत एक किलो कचºयावरही प्रक्रिया होणे अशक्य आहे.
चार दिवसांमध्ये कचºयावर प्रक्रिया सुरू होईल, असा दावा महापालिका प्रशासन पदाधिकारी १५ आॅगस्टपासून करीत आहेत. हा दावा किती खरा आहे, हे जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने शहरातील प्रमुख कचरा प्रक्रिया केंद्रांवर पाहणी केली असता धक्कादायक बाबी समोर आल्या. चिकलठाणा, रमानगर, जकात नाका येथे प्रत्येकी १६ टन कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी नागपूर येथील कंपनीची नियुक्ती केली. या कंपनीने २ आॅगस्टपासून मध्यवर्ती जकात नाक्यावर यंत्रसामग्री अक्षरश: धूळखात पडून आहे. जकात नाक्यावर मनपा प्रशासनाने शेड उभारले. या शेडमध्ये मशीन बसूच शकत नाही. आता दुसरे शेड उभारण्यात येणार आहे. चिकलठाण्यात शेड उभारणीचे काम जमिनीतच आहे. या ठिकाणी केंद्रीय कचरा प्रक्रिया केंद्र, छोट्या मशीनसाठी स्वतंत्र शेड उभारण्याचा विचार आहे. आणखी दोन ते तीन महिने मनपाकडून शेड उभारणे, थ्री फेस लाईटचे मीटर आणून देणे, पाणी या सुविधा देणे अशक्य आहे. रमानगर स्मशानभूमी येथे शेड उभारणीचे कामच सुरू झालेले नाही.
चिकलठाण्याची अवस्था नारेगावसारखी
मागील तीन महिन्यांपासून महापालिका चिकलठाण्यातील दुग्धनगरीच्या जागेवर कचरा टाकत आहे. या कचºयात मेलेली जनावरे, दुर्गंधी, कचºयातून बाहेर निघणारे घाण पाणी यामुळे परिस्थिती अत्यंत विदारक बनली आहे.
या भागातील नागरिकांकडून होणारा विरोध अत्यंत रास्त असल्याचे दिसून येत आहे. ज्या ठिकाणी मनपाने कचºयाचा डोंगर तयार केला आहे, तेथे दोन मिनिटेही थांबणे अशक्य आहे.
पडेगाव, चिकलठाण्याचे काय?
पडेगाव, चिकलठाणा येथे १५० मेट्रिक टनाचे दोन मोठे प्रकल्प उभारण्याचे काम मायोवेसल कंपनीला दिले आहे. या कंपनीवर होत असलेले आरोप, स्थायी समिती सदस्यांनी केलेले बंड, कंपनीसोबत होणारा करार वादाच्या भोवºयात सापडला आहे.
आणखी सहा महिने तरी ३०० मेट्रिक टन कचºयावर प्रक्रिया करण्याचे काम सुरू होणार नाही. २४ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाºया शेडच्या कामाचा श्रीगणेशाच झालेला नाही. शेड उभारणीसाठी कंत्राटदाराला मनपा अधिकारीच अजिबात सहकार्य करायला तयार नाहीत.