औरंगाबाद महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहमद निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:50 PM2018-11-20T12:50:01+5:302018-11-20T12:50:47+5:30
मालमत्ता कराच्या वसुलीत अक्षम्य हलगर्जीपणा केल्याबद्दल निलंबित केले.
औरंगाबाद : महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहमद यांना आज सकाळी मनपा आयुक्त डॉ निपुण विनायक यांनी मालमत्ता कराच्या वसुलीत अक्षम्य हलगर्जीपणा केल्याबद्दल निलंबित केले.
यंदाचे महापालिकेचे कर वसुलीचे उद्दिष्ट सुमारे ४५० कोटी रुपये आहे. मागील वर्षी ८० कोटी वसूल झाले होते. यंदा सर्वाधिक वसुलीचा विक्रम करण्याचा आयुक्तांचा मानस आहे. यातूनच मनपा प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी मिळून वसुली आणि नियमितीकरण योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासाठी आयुक्तांनी ९ पथके स्थापन करून वसुली मोहीम सोमवार पासून सुरु केली आहे. दरम्यान,आयुक्तांनी याआधी ३ मोठ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. पहिले उपायुक्त रवींद्र निकम , प्राणिसंग्रहालय संचालक डॉक्टर बी .एस . नाईकवाडे आणि संजय जक्कल यांना आयुक्तांनी निलंबित केले.
यानंतर आज सकाळी महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहमद यांना मनपा आयुक्त डॉ निपुण विनायक यांनी मालमत्ता कराच्या वसुलीत अक्षम्य हलगर्जीपणा केल्याबद्दल निलंबित केले.