औरंगाबाद ‘फास्ट ट्रॅकवर’; लवकरच नगर, उस्मानाबाद, बीड गाठता येईल रेल्वेने
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 01:18 PM2022-07-28T13:18:47+5:302022-07-28T13:21:51+5:30
New Railway Route From Aurangabad: रेल्वे मार्गांचे सर्वेक्षण प्रगतिपथावर आहे. त्यामुळे त्यांच्या कामांना मंजुरी मिळून नवीन मार्ग पूर्णत्वास येतील, अशी अपेक्षा
औरंगाबाद :औरंगाबादहून आगामी कालावधीत अहमदनगर, उस्मानाबाद, भुसावळ, बुलडाणा, खामगाव या ठिकाणी रेल्वेने अवघ्या काही तासांत पोहोचणे शक्य होणार आहे. काही नव्या रेल्वेंचे सर्वेक्षण पूर्ण झाले, तर काहींचे सर्वेक्षण प्रगतिपथावर आहे. नवे रेल्वे मार्ग सध्या ‘फास्ट ट्रॅक’वर घेण्यात आल्याने रेल्वे संघटनांकडून दिलासा व्यक्त होत आहे.
देशभरातील नव्या रेल्वे मार्गांच्या सर्वेक्षणाची सध्याची स्थिती समोर आली आहे. यात औरंगाबाद-अहमदनगर, उस्मानाबाद-बीड-औरंगाबाद, औरंगाबाद-भुसावळ, औरंगाबाद-बुलडाणा, जालना-खामगाव, जालना-जळगाव या रेल्वे मार्गांचा समावेश आहे. औरंगाबाद-अहमदनगर रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण झाले असून, पाहणी अहवाल सादर करण्यात आलेला आहे. उस्मानाबाद-बीड-औरंगाबाद रेल्वे मार्गाचेही सर्वेक्षण झाले असून, अहवालही तयार झालेला आहे.औरंगाबाद-भुसावळ या रेल्वे मार्गाचा ग्राफिक सर्व्हे, ट्राफिक फिल्ड सर्वेक्षण झालेले आहे. अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. औरंगाबाद-बुलडाणा-खामगाव रेल्वे मार्गाच्या अभियांत्रिकीचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे.
रेल्वे स्टेशनवर विद्युतीकरणाचे काम सुरू
औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाच्या दृष्टीने काम सुरू झाले. विद्युतीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या खांबांसाठी सध्या खड्डे खोदण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
मंजुरी मिळेल
रेल्वे मार्गांचे सर्वेक्षण प्रगतिपथावर आहे. त्यामुळे त्यांच्या कामांना मंजुरी मिळून नवीन मार्ग पूर्णत्वास येतील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे औरंगाबाद शहराची रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढेल.
- स्वानंद सोळंके, रेल्वे अभ्यास