पैठणी, केसर आंबा, सीताफळाची भक्कम साथ; देशातील निर्यातक्षम ‘टॉप ३०’ जिल्ह्यांत औरंगाबाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2021 01:22 PM2021-12-14T13:22:42+5:302021-12-14T13:24:17+5:30

वाणिज्य मंत्रालय या यादीतील प्रत्येक जिल्ह्याची निर्यात वाढविण्यासाठी, परदेशात खरेदीदार शोधण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

Aurangabad is one of the top 30 exportable districts in the country,mainly exports Paithani, Kesar mango, Custard | पैठणी, केसर आंबा, सीताफळाची भक्कम साथ; देशातील निर्यातक्षम ‘टॉप ३०’ जिल्ह्यांत औरंगाबाद

पैठणी, केसर आंबा, सीताफळाची भक्कम साथ; देशातील निर्यातक्षम ‘टॉप ३०’ जिल्ह्यांत औरंगाबाद

googlenewsNext

औरंगाबाद : केंद्रीय वाणिज्य व ऊर्जा मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणानुसार निर्यातीच्या बाबतीत औरंगाबाद जिल्ह्याने देशात २७ वे स्थान पटकावले आहे. देशातील ज्या जिल्ह्यांमधून औद्योगिक निर्यात केली जाते, त्यांची ‘टॉप ३०’ यादी आकडेवारीसह या मंत्रालयाकडून जाहीर केली जाते. 

एप्रिल २०२१ पासून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली. एप्रिल ते सप्टेंबर या पहिल्याच सर्वेक्षणात महाराष्ट्राने बाजी मारली आहे. गुजरातमधील जामनगर आणि सुरत या दोन जिल्ह्यांनी अनुक्रमे पहिला व दुसरा क्रमांक पटकावला असून, मुंबई तिसऱ्या स्थानी आहे. पुणे पाचव्या, तर ठाणे १३ व्या क्रमांकावर आहे. रायगड (१५ व्या), पालघर (२८ व्या) या जिल्ह्यांनीही यादीत स्थान मिळविले आहे.

वाणिज्य मंत्रालय या यादीतील प्रत्येक जिल्ह्याची निर्यात वाढविण्यासाठी, परदेशात खरेदीदार शोधण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी उत्पादने आणि सध्याच्या निर्यातीच्या आकड्यांचे संकलन करण्यात आले असून, त्या आधारे कृती आराखडा तयार केला जात असल्याचे या मंत्रालयाकडून कळविण्यात आले आहे.

औरंगाबादेत निर्यातीसाठी मोठा वाव
औरंगाबादेतील उद्योगांना निर्यातीसाठी मोठा वाव आहे. येथील स्टील, ऑटोमोबाईल, फार्मसी उद्योगांकडून मोठी आयात-निर्यात केली जाते. सूक्ष्म, लघु, मध्यम (एमएसएमई) उद्योगांनाही निर्यातीसाठी चांगली संधी आहे. मात्र, हे उद्योजक आपल्या उद्योगातच गुरफटून जातात. विदेशातील प्रदर्शनात स्टॉल लावण्याची गरज आहे. ‘सीएमआयए’ने देखील येथील उद्योगांकून मोठ्या प्रमाणात निर्याती केली जावी, यासाठी पुढाकार घेतला आहे.
- शिवप्रसाद जाजू, अध्यक्ष, सीएमआयए

औरंगाबाद जिल्ह्याने कशाची, किती निर्यात केली
अभियांत्रिकी उत्पादने -१०६२.०७ कोटी (पैठणी साडी व कापड, मराठवाडा केसर, बीड सीताफळ)
औषधी उत्पादने - २१७.३९ कोटी
प्लास्टिक व लिनोलिअम- १४९.९ कोटी
मांस, दूध आणि कुक्कुट उत्पादने -४३.६० कोटी
एकूण पाच उत्पादने -१,५१४.५८ कोटी
जिल्ह्याची एकूण निर्यात -१७३४.२२ कोटी 

Web Title: Aurangabad is one of the top 30 exportable districts in the country,mainly exports Paithani, Kesar mango, Custard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.