औरंगाबाद बंदी घातलेल्या पोलिओ लसच्या धोक्याबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 03:49 PM2018-10-03T15:49:05+5:302018-10-03T15:50:03+5:30
टाईप टू प्रकारचे विषाणू आढळलेल्या पोलिओ लसीच्या वापरावर बंदी घालण्यात आली.
औरंगाबाद : टाईप टू प्रकारचे विषाणू आढळलेल्या पोलिओ लसीच्या वापरावर बंदी घालण्यात आली. राज्यामध्येही तिचा वापर केला गेला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, परंतु औरंगाबादेत ही लस आलेलीच नसल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.
औरंगाबादेत महिनाभरात आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून दीड लाख पोलिओ लसीचे वितरण करण्यात आले. भारत पोलिओमुक्त म्हणून घोषित करण्यात आला आहे; परंतु गाझियाबादमधील एका कंपनीद्वारे तयार करण्यात आलेल्या लसींमध्ये टाईप-२ पोलिओ व्हायरस आढळल्याने खळबळ उडाली.
आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे म्हणाले, सदर लसीचा पुरवठा झालेलाच नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये. शिवाय संबंधित पोलिओ लसीतील व्हायरस आजार तयार करणारा नाही. हा व्हायरस प्रतिकार शक्ती तयार करतो.